Saif Ali Khan, Kareena Kapoor and Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

करीना कपूरने अक्षय कुमारबद्दल केला खुलासा

पुन्हा एकदा करीना कपूरने अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री करीना कपूर नेहमीच चर्चेत असते. प्रसारमाध्यमांमध्ये, ती अनेकदा असे काही बोलते ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात येते. आता पुन्हा एकदा तिने अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. लग्नाआधी करिनाने सैफ अली (Saif Ali Khan) खानसोबतच्या डेटींगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचेही (Akshay Kumar) नाव पुढे येत आहे. करीना कपूर (Kareena Kapoor) अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या 'ट्वीक इंडिया' शोचा भाग बनली होती. जिथे करीनाने तिच्या करिअर, अफेअर्स, ब्रेकअप, लग्न आणि मुलांपर्यंतच्या तिच्या आयुष्यातील सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. (Kareena Kapoor Latest News)

संभाषणादरम्यान करिनाने सैफसोबतचे तिचे डेटिंगचे दिवस आठवले आणि सांगितले की, 'टशन चित्रपटादरम्यान मी, सैफ आणि अक्षय कुमार एकत्र काम करत होतो. तेव्हा अक्षयला थोडी कल्पना आली की माझ्यात आणि सैफमध्ये काहीतरी आहे. म्हणून त्याने सैफला कोपऱ्यात नेले आणि काळजी घेण्यास सांगितले, ती धोकादायक कुटुंबातील एक धोकादायक मुलगी आहे. मी त्यांना ओळखतो, तू सावधान राहा.'

करिनाच्या या गोष्टीवर ट्विंकल म्हणाली की, मला वाटते की हा चांगला सल्ला होता. करीनाने याला सहमती दर्शवली आणि अक्षयने सांगितले होते की, तिच्यासोबत चुकीचे करू नका. यावर सैफ म्हणाला की, 'मी करीनाला ओळखतो आणि तिला सांभाळेन.' शो दरम्यान, ट्विंकल खन्नाने खिल्ली उडवली आणि करीनाला विचारले की यावेळी ती ब्लॉन्ड विग घातलेल्या सैफच्या प्रेमात कशी पडली?

आम्ही तुम्हाला सांगतो, 'ट्वीक इंडिया' हा YouTube वर येणारा एक चॅट शो आहे. ज्यामध्ये ट्विंकल खन्ना सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते.करीना कपूर आणि सैफ अली खान 2008 मध्ये टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. आता दोघांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT