बॉलीवुडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या 'रंग दे बसंती' या चित्रपटाची कथा आजसुद्धा लोकांच्या हृदयात आहे. मस्ती की पाठशाळा, 'रंग दे बसंती' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील ही गाणी आज देखील अनेकांच्या मनावर राज करत आहेत. आजसुद्धा 'लुका छुपी' हे गाण एकल्यावर डोळ्यात पाणी येत. आज या गाण्याशी संबंधित लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा किस्सा सांगणार आहोत.
'लुका छुपी' (Luka Chuppi) हे गाण गानसम्राज्ञीं लता मंगेशकर यांनी गायले होते. या गाण्याला संगीत (Music) ए आर रहमान यांनी दिले होते. तर या गाण्याचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले होते. हे गाणं इतके हृदयस्पर्शी आहे. लता दिदींनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी 'लुका छुपी' या गाण्यासाठी अनेक दिवस रिहर्सलही केली. याशिवाय रेकॉर्डिंगच्या (Recording) दिवशी लता दिदी आठ तास उभ्या होत्या.
या गोष्टीचा खुलासा स्वत: चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे. या गाण्याबद्दल त्यांनी सांगितले की लुका छुपी गाण्याचे शूटिंग 15 नोव्हेंबरला होणार होते, पण लता दिदी 9-10 नोव्हेंबरला चेन्नईला आल्या होत्या. त्यांनी पुढे सांगितले की, त्या लोकाना आधी वाटले की त्या चेन्नईला आणखी काही कामासाठी आल्या आहेत पण नंतर कळले की त्यागाण्याच्या शूटिंगसाठीच आधी आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.