Kareena Kapoor Khan and Hrithik Roshan Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood Upcoming Movie: रुपेरी पडद्यावर तब्बल 19 वर्षानंतर झळकणार बेबो आणि हृतिक

19 वर्षापूर्वी "मै प्रेम की दिवानी हू" या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मन जिंकणारी हृतिक रोशन आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

अनेक बॉलीवुड जोडप्यांना कायमच रुपेरी पडद्यावर पाहणे चाहत्यांना आवडते. दुसरीकडे प्रेक्षकांनाही (Fans) बॉलीवुड सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या जोड्या ऑनस्क्रीन पाहणे आवडतात. त्याचवेळी अनेक बॉलीवुड (Bollywood) जोडपे ऑनस्क्रीन प्रसिद्ध आहेत. अशीच जोडी म्हणजे हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) असून त्यांना ग्रीक गॉड म्हंटले जाते. तब्बल 19 वर्षापूर्वी "मै प्रेम की दिवानी हू" (Main Prem Ki Deewani Hoon) या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मन जिंकणारी ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

* 19 वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार

'मैं प्रेम की दिवानी हूं' या चित्रपटानंतर हृतिक-करीना कोणत्याही चित्रपटामध्ये एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. koimoi च्या रिपोर्टनुसार, हृतिक (Hrithik Roshan) आणि करीनाला (Kareena)एका बिग बजेट चित्रपटाची (Movie) ऑफर देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जंगली पिक्चर्स निर्मित एका चित्रपटासाठी हे दोन्ही कलाकार एकत्र आले आहेत.

* 'उलज' या चित्रपटामध्ये दिसणार एकत्र

मिळालेल्या माहितीनुसार हृतिक- करीनाच्या आगामी चित्रपटाचे (Movie) नाव 'उलज' आहे. पण या दोन्ही कलाकारांनी चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले नाही. म्हणजेच फक्त मेकर्सकडून त्यांना ऑफर आल्या आहेत पण चित्रपटामध्ये एकत्र काम करायचे की नाही हे कलाकारांच्या निर्णयावर अवलंबून आहे.

करीना-हृतिकची जोडी करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम', 'यादे', 'मैं प्रेम की दिवानी हूं' यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांना एकत्र काम करतांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लवकरच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) प्रथमच 'फायटर' (Fighter) या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच ऋतिक 'वेध' या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे करीना लाल सिंग चड्ढा या चित्रपटामध्ये आमीर खानसोबत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

Goa Live News: पंतप्रधान मोदी काणकोण दौऱ्यावर! भव्य स्वागतासाठी गोवा सज्ज: मंत्री रमेश तवडकर

SCROLL FOR NEXT