Kareena Kapoor in Singham 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor : करीना कपूर दिसणार सिंघम 3 मध्ये, चित्रपटाची अपडेट देताना म्हणाली...

अभिनेत्री करीनाने तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे.

Rahul sadolikar

Kareena Kapoor in Singham 3 : बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूर 21 सप्टेंबर रोजी आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी करीनाने आपल्या चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं आहे.

21 सप्टेंबरला करीनाची ओटीटी फिल्म रिलीज झाली असुन आजच्याच दिवशी करीनाने सिंघम 3 चित्रपटातल्या आपल्या भूमीकेविषयी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी अपडेट्स दिले आहेत.

सिंघमची अपडेट्स

आपल्या वाढदिवसादिवशी करीनाने आपल्या चाहत्यांना सिंघम चित्रपटाबद्दलची अपडेट्स देऊन खुश केले आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम 3 चा भाग बनणार असल्याचे संकेत अभिनेत्री करीना कपूरने दिले आहेत.

 फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत करिनाने तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. सिंघमच्या अपडेट्स देताना करीनाने हेही सांगितले की ती 'सध्या माझ्या करिअरमधला सर्वोत्तम वेळ घालवत आहे'

करीना म्हणाली

फिल्म कम्पॅनियनशी बोलताना करीना म्हणाली, "आता, स्टारडमबद्दल काही राहिले नाही. मला आता स्टारडम मिळवायचे नाही.

मला कॅरेक्टर्स करायचे आहेत कारण मला नेहमीच कॅमेऱ्यासमोर राहायचे होते आणि त्यासाठीच मला ओळखले जाते.

23 वर्षांचे करीनाचे करिअर

एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच पात्रावर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॉकबस्टर्स चित्रपट हे समीकरण 23 वर्षे चालू शकत नाही.

परंतु मला वाटते की मी माझ्या जीवनातील सर्वोत्तम वेळ घालवत आहे करिअर आत्ता आणि पुढच्या दोन चित्रपटांचा विचार करत आहे मग ते जाने जा असो किंवा द बकिंगहॅम मर्डर्स.

अभिनेत्री म्हणून स्वत:चा शोध घ्यायचा आहे.

ती पुढे म्हणाली, "मी एका टप्प्यात प्रवेश करत आहे जे माझ्यासाठी अज्ञात आहे पण मी खूप उत्साही आहे. मला फक्त एक्सप्लोर करायचं आहे. माझा दृष्टिकोन यश किंवा अपयशाबद्दल नाही किंवा हे बॉक्स ऑफिसबद्दलच्या दबावाबद्दल नाही.

अर्थात, तिथे द क्रू असेल आणि सिंघम असेल आणि त्यात सर्व काही असेल ज्यात काही उत्कृष्ट नायिका म्हणून तुम्हाला बेबो दिसेल. पण मला फक्त एक अभिनेत्री म्हणून स्वतःचा शोध घेणे आवडते."

दीपिका पदूकोणही चित्रपटात दिसणार

रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोण पोलिस अवतारात दिसणार आहे . या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि श्वेता तिवारी यांच्याही भूमिका आहेत. 

सिंघम 2011 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात काजल अग्रवाल आणि प्रकाश राज यांनी मुख्य भूमिका केल्या. त्यानंतर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स आला. सिंघम 3 हा चित्रपट 2024 च्या दिवाळीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

करीनाच्या जाने जा ची चर्चा

गुरुवारपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग सुरू झालेल्या सुजॉय घोषच्या 'जाने जान'मध्ये करीनाची मुख्य भूमिका आहे.

 चित्रपटात, माया (करीना), नरेन (जयदीप अहलावत) आणि करण (विजय वर्मा) यांच्या मुख्य भूमीका असणारा सस्पेन्स थ्रिलर जाने जा आजपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. या चित्रपटातून करिनाचे ओटीटी पदार्पण होणार आहे.

करीनाचे आगामी चित्रपट

याशिवाय करिनाच्या आगामी चित्रपटांमध्ये द क्रू देखील आहे. या चित्रपटात तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्येही करीना दिसणार आहे. 

या चित्रपटातून करिनाचे निर्माती म्हणून पदार्पण होत आहे. या चित्रपटाची सहनिर्माती एकता कपूर आहे. थोडक्यात 2023 आणि 2024 मध्ये करीनाचे बरेचसे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT