Imali : 'इमली'च्या सेटवर लाईटमनचा मृत्यू...AICWA कडून 50 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी

प्रसिद्ध मालिका 'इमली'च्या सेटवर एका लाईटमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.
Lightman Dies at Imali Set
Lightman Dies at Imali SetDainik Gomantak
Published on
Updated on

Lightman Dies at Imali Set : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून सध्या एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. प्रेक्षकांची लाडकी सिरीयल इमलीच्या सेटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे.

इमलीच्या शूटिंगदरम्यान एका लाईटमॅनला विजेचा धक्का बसला आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. एआयसीडब्ल्यूएने आता सुरक्षेअभावी निर्मात्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

हिंदी टीव्ही शो इमलीच्या (Imali Hindi Serial) सेटवर लाइटबॉय म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय महेंद्र यादवचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

एआयसीडब्ल्यूए (ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शोचे निर्माते गुल खान आणि टीव्ही चॅनल - स्टार प्लस - सेटवरील सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली आहे.

AICWA ने मृतांच्या कुटुंबाला ₹ 50 लाख नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. गोरेगाव इथल्या इमलीच्या सेटवर ही घटना घडली.

निर्मात्यांवर काईवाईची मागणी

एका सोशल मीडिया व्हिडिओमध्ये, AICWA अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मृत्यूबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली

गुप्ता यांनी प्रतिक्रिया देताना इमलीचे निर्माते गुल खान, PH 4 लायन फिल्म्स - आणि शो प्रसारित करणार्‍या चॅनेलच्या निर्मात्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नुकसान भरपाईच्या मागणीशिवाय, एआयसीडब्ल्यूए च्या अध्यक्षांनी असेही म्हटले आहे की फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि आयुक्तांनी राजीनामा द्यावा.

अपघातानंतर शूटींग थांबवण्यात आलं

इमलीच्या सेटवर महेंद्र यादवचा अपघात झाल्याचे समजताच शूटींग थांबवण्यात आलं.ETimes मधील एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की महेंद्रला विजेचा धक्का लागल्यावर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

AICWA अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता

घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त करताना AICWA अध्यक्ष सुरेश गुप्ता म्हणाले “प्रशासनातील लोक सिने कामगारांना कीटक समजतात. त्यांना असं वाटतं की या कामगारांना कोणत्याही सुरक्षेच्या उपायांची गरज नाही. प्रशासनाने सेटवरील सुरक्षेसाठी कधीही पावले उचलली नाहीत. ते नेहमी सुरक्षिततेशी संबंधित धोक्यांकडे दुर्लक्ष करतात". 

सुरेश गुप्ता पुढे म्हणाले

आपली नाराजी तीव्रपणे व्यक्त करताना गुप्ता पुढे म्हणाले "यामुळे भविष्यातही आणखी अनेक मृत्यू होतील. जबाबदारी कोण घेणार? म्हणून, AICWA प्रमुख या नात्याने, मी फिल्म सिटीचे एमडी आणि टीव्ही शोच्या सेटवर सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या इतर अधिकार्‍यांचा तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करतो," .

Lightman Dies at Imali Set
Hina Khan : "हे लोक धर्माची चेष्टा करतात, आधी उमराह आणि आता बाप्पा" 'हीना खान'ला यूजर्स करतायत ट्रोल

गुप्ता यांची पोस्ट

आपल्या पोस्टमध्ये सुरेश गुप्ता यांनी असा आरोप केला आहे की 'शोचे निर्माता, प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनेलने सेटवर सुरक्षा पाळली नाही आणि याच कारणामुळे कामगाराला आपला जीव गमवावा लागला'. ते पुढे म्हणाले की फिल्मसिटीमध्ये असे अपघात अनेकदा घडतात जसे की सेटवर आग लागणे, बिबट्याचे हल्ले आणि विजेचा धक्का लागूनही लोकांचा मृत्यू होतो.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com