Kapil Sharma Show  Dainik Gomantak
मनोरंजन

कपिल शर्माचा शो होणार बंद; रॅप-अप पार्टीत कलाकारांची धमाल

Kapil Sharma Show Wrapped Up Party : कॉमेडियन कपिल शर्माचा शो काही काळासाठी बंद होणार आहे.

दैनिक गोमन्तक

कॉमेडियन कपिल शर्माचा शो काही काळासाठी बंद होणार आहे. या शोची जागा 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' घेणार आहे. या शोमध्ये अर्चना पूरण सिंग आणि शेखर सुमन दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोची रॅपअप पार्टी शुक्रवारी पार पडली.

ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुमोना चक्रवर्ती आणि शोच्या जज अर्चना पूरण सिंह यांनी अनेक सेल्फी आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये कपिल शर्मा पत्नी गिन्नी चतरथसोबत डान्स करताना दिसत आहे. या रॅपअप पार्टीमध्ये कृष्णा अभिषेकपासून ते किकू शारदापर्यंत सगळ्यांनी खूप मजा केली. (Kapil Sharma Show Wrapped Up Party)

सुमोना चक्रवर्तीने सोशल मीडियावर संपूर्ण कलाकारांसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो खूप मस्ती करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सुमोनाने लिहिले - 'थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटू.' सुमोनाच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले - लव्ह यू ब्राउन. त्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

शोच्या जज अर्चना पूरण सिंहने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कपिल शर्मा पत्नी गिन्नीसोबत डान्स करताना दिसत आहे.

हा असेल शेवटचा भाग

'द कपिल शर्मा शो'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये जुग जुग जिओची टीम येणार आहे. या एपिसोडमध्ये नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि मनीष पॉल दिसणार आहेत. या एपिसोडचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT