Kapil Sharma Dainik gomantak
मनोरंजन

Kapil Sharma: कपिल शर्मा म्हणतो आमच्या सारख्या गरिबांसाठी 'गोवा' विदेशच

गोव्याची असलेल्या वलुशा डिसुजाला तनाव वेब सिरिजमध्ये तुझी कशी निवड झाली? असा प्रश्न विचारतो.

Pramod Yadav

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या हजरजबाबीपणा आणि कॉमेडिच्या टायमिंगसाठी ओळखला जातो. मागील दहा वर्षांपासून त्याचा 'द कपिल शर्मा शो' (The kapil Sharma Show) जोमात सुरू आहे. सिनेमांचे प्रमोशन आणि कॉमेडी असे या शोचे स्वरूप आहे. बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार कपिलच्या शोमध्ये हजेरी लावत असतात. नुकतेच त्याच्या शोमध्ये 'तनाव' (Tanaav) या वेब सिरिजच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

'तनाव'ची स्टारकास्ट (Tanaav Starcast) अरबाज खान (Arbaaz Khan), वलुशा डिसुजा (Waluscha De Sousa), सुधीर मिश्रा (Sudhir Mishra) यासह इतर कलाकारांनी नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली. यात कपिल शर्मा वलुशा डिसुजाला तनाव वेब सिरिजमध्ये तुझी कशी निवड झाली, याबाबत प्रश्न विचारतो.

यावर उत्तर देताना वलुशा म्हणाली, "या वेब सिरिजसाठी मला निर्मात्याच्या मागे धावावं लागलं कारण यात काम करायचंच होतं. मी या सिरिजमध्ये काश्मिरी मुस्लिम महिलेची भूमिका साकारत आहे. माझ्या बद्दल खूप गैरसमज पसरवण्यात आले होते. मला हिंदी नाही बोलता येत किंवा, मी विदेशी आहे. पण मी माझा गोव्यात झाला आहे."

कपिल शर्मा यावर लगेच टायमिंग साधत, "आमच्या सारख्या गरिबांसाठी 'गोवा' विदेशच आहे," अशी टिपण्णी करतो यांनी वलुशासह सर्व प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. तसेच, मी तुमचे नाव ऐकल्यानंतर मला वाटलं तुम्ही फ्रेंच पण बोलत असाल? असे कपिल म्हणाला.

त्यानंतर बोलताना वलुशा डिसुजा (Waluscha De Sousa) म्हणाली, फ्रेंच नाही पण कोंकणी, पोर्तुगीज, जर्मन बोलते. असे म्हणाली. कपिलने वलुशाला तिच्या नावाचा अर्थ देखील विचारला यावर उत्तर देताना वलुशा म्हणजे 'लेडी ऑफ वुड्स' असा आपल्या नावाचा अर्थ सांगितला. तसेच, हे नाव जर्मन भाषेतील असल्याचे वलुशा म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT