Kantara  Dainik Gomantak
मनोरंजन

Kantara 2 Latest Update: 'कांतारा 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'कांतारा' हिट झाल्यानंतर आता 'कांतारा 2'ची स्क्रिप्ट पूर्णपणे तयार झाली आहे. या चित्रपटाच्या घोषणेची बातमी चाहत्यांना लवकरच मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

Kantara 2 Latest Update: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. एकीकडे 2022 मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले, तर दुसरीकडे 'कांतारा'ने चांगलाच कमाइ केली.

हा चित्रपट हिट झाल्यापासून चाहते त्याच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. आता लवकरच 'कांतारा 2'ची घोषणा होऊ शकते.

  • कांतारा 2 ची लवकरच होऊ शकते घोषणा

ऋषभ शेट्टीच्या जवळच्या लोकांकडून अशी माहिती मिळाली आहे की, 'कांतारा 2'ची लवकरच घोषणा होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार कांतारा 2 ची स्क्रिप्ट जवळपास पूर्ण झाली आहे. निर्माता विजय किरगांडूर आणि अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूप खूश आहेत. 

चित्रपटाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्टी दरम्यान, त्याचा सीक्वल बनवण्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. आता फक्त 'कांतारा 2' ची घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा आहे.

सध्या चित्रपटाची टीम पाऊस असूनही शूटिंगसाठी उत्तम लोकेशन्स शोधत आहे. यासोबतच अशीही बातमी आहे की, जर सर्व काही सुरळीत झाले तर जूनपर्यंत चित्रपट पुर्ण होउ शकतो.

हंबेल फिल्म्सच्या बॅनरखाली 'कांतारा' बनवण्यात आला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ऋषभ शेट्टीनेही मुख्य भूमिका साकारली होती. 'कांतारा' हा चित्रपट केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. 

इतक्या कमी बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाइ केली. यासोबतच ऋषभ शेट्टीच्या कामालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. IMDb ने या चित्रपटाला 8.3 रेटिंग दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT