Kangana Ranaut reacting to the CJP GenZ protest during a public appearance Dainik Gomantak
मनोरंजन

CJP GenZ Protest: "GenZ म्हणजे गटर जनरेशन!" जंतर-मंतरवरील रील्स पाहून कंगना रणौतचा संताप; तरुण पिढीला सुनावले खडेबोल

Kangana Ranaut Slams CJP GenZ Protesters: कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या आंदोलक तरुणांवर जोरदार हल्लाबोल केला.

Manish Jadhav

Kangana Ranaut Slams CJP Gen Z Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीचे सुरु असलेले आंदोलन अखेर संपले असले, तरी या आंदोलनाशी संबंधित GenZ चे अनेक व्हिडिओ आणि रील्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे व्हायरल व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची भाजप खासदार कंगना रणौतचा पारा चढला. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या आंदोलक तरुणांवर जोरदार हल्लाबोल केला. या तरुण पिढीच्या भाषेवर आणि वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढत तिने आपला तीव्र राग व्यक्त केला.

कंगनाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, सोशल मीडियावर GenZ चे हे व्हायरल रील्स पाहून तिला मळमळायला लागल्यासारखे होत आहे. तिने आयुष्यात कधीही एकाच फ्रेममध्ये इतक्या किळसवाण्या आणि भयंकर गोष्टी पाहिल्या नव्हत्या. हे आंदोलक ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत, ती अत्यंत अश्लील आणि ऐकण्यायोग्य नाही.

तरुणांच्या या वर्तनावर आणि त्यांच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित करत कंगनाने विचारले की, अशा मुलांना जन्म कोण देत आहे आणि त्यांचे पालनपोषण कोण करत आहे? तुम्ही स्वतःला कॉकरोच म्हणवता आणि अगदी त्याच्यासारखेच वर्तनही करता. हे सर्व प्रकार पाहून आपल्याला मोठा धक्का बसला असून, आता मानसिक शांतीसाठी 'डिजिटल डिटॉक्स' म्हणजेच काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून पूर्णपणे ब्रेक घेण्याची गरज असल्याचे कंगनाने स्पष्ट केले.

एवढ्यावरच न थांबता कंगनाने या पिढीला थेट 'गटर जनरेशन' असे संबोधले. हे लोक ड्रग्ज आणि दारुच्या स्वातंत्र्यावर स्वतःचा अभिमान बाळगत आहेत आणि आई-वडिलांच्या कमाईवर उधळपट्टी करत जीवन जगत आहेत. यावेळी कंगनाने GenZ मधील महिलांनाही लक्ष्य केले. ही पिढी अभ्यासात अजिबात हुशार नसून, या मुली भविष्यात चांगल्या गृहिणीसुद्धा बनू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका तिने केली. कंगनाची ही वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून, यावरुन पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT