CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

CJP Protest Violence Pakistan Social Media Connection: कॉकरोच जनता पार्टीच्या 'संसद चलो' आंदोलनादरम्यान झालेल्या भयंकर हिंसेच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा झाला.
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest ViolenceDainiki Gomantak
Published on
Updated on

CJP Protest Violence Pakistan Social Media Connection: कॉकरोच जनता पार्टीच्या 'संसद चलो' आंदोलनादरम्यान झालेल्या भयंकर हिंसेच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा झाला. दिल्ली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसेदरम्यान पाकिस्तानमधून अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स सक्रियपणे चालवले जात होते आणि तिथूनच दिल्लीत दंगल भडकवण्याचा कट रचला गेला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 15 विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून, हिंसाचारात थेट सहभाग असलेल्या तब्बल 2500 हुल्लडबाजांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

तपासादरम्यान समोर आलेले सर्वात मोठे वास्तव म्हणजे, हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली होती. तरीसुद्धा 20 ते 25 जुलै दरम्यान दगडफेक करणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्या दंगेखोरांनी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या 'ब्लूटूथ मेश-नेटवर्क' ॲप्सचा चाणाक्षपणे वापर केला. या नेटवर्कच्या माध्यमातून सिक्रेट मेसेज पाठवून पोलिसांवर हल्ले चढवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) कनॉट प्लेस, मंदिर मार्ग, टिळक मार्ग, पार्लमेंट स्ट्रीट आणि कर्तव्य पथ पोलीस ठाण्यांमध्ये दंगल घडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि थेट हत्येचा प्रयत्न करणे अशा 13 गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.

CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

उपद्रव करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फेसियल रिकग्निशन सिस्टीम, एआय कॅमेरे आणि हजारो सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. घटनास्थळावरील मोबाईल व्हिडिओ आणि सोशल मीडिया चॅट्सचा फॉरेन्सिक तपास सध्या वेगाने सुरु आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांवर स्पष्टीकरण देताना पोलीस सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच पुढील पावले उचलली जातील; मात्र दंगल घडवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला किंवा असामाजिक तत्त्वाला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई सुरुच राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com