इफ्फीत चित्रपट तंत्रज्ञानातील नवउद्योजकांना संधी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून वेव्हएक्स स्टार्टअप दालनासाठी अर्ज आमंत्रित

IFFI Film Technology Startups: २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) चित्रपट आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योजकांना आपले संशोधन, उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे.
IFFI Film Technology Startups
IFFI Film Technology StartupsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) चित्रपट आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योजकांना आपले संशोधन, उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वेव्हज बझार’मधील ‘वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियन’मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र स्टार्टअप कंपन्यांकडून अर्ज मागविले आहेत.

IFFI Film Technology Startups
Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

या उपक्रमाचा उद्देश भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रासमोर नव्या तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे हा आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असताना नवउद्योजकांना आपली उत्पादने आणि नावीन्यपूर्ण संकल्पना जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना चित्रपट निर्माते, निर्मिती संस्था, गुंतवणूकदार आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. त्यातून व्यावसायिक भागीदारी, तंत्रज्ञानविषयक सहकार्य आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

डीपीआयआयटी नोंदणी आवश्यक

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे (डीपीआयआयटी) नोंदणी असणे आवश्यक आहे. चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्टअप कंपन्यांनाच अर्ज करता येणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून वेव्हएक्सने नियुक्त केलेली निवड समिती पात्र कंपन्यांची निवड करणार आहे.

त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळेलच, असे नाही. निवड झालेल्या कंपन्यांना वेव्हएक्सच्या स्वतंत्र प्रदर्शन दालनांमध्ये आपली उत्पादने, तंत्रज्ञान आणि उपाययोजना सादर करता येतील. या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील संबंधित घटकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

IFFI Film Technology Startups
Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

अर्जासाठी संकेतस्थळ उपलब्ध

इच्छुक आणि पात्र स्टार्टअप कंपन्यांना ‘wavex.wavesbazaar.com’ या संकेतस्थळावर अर्ज आणि अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील शंकांसाठी ‘Wavex-mib@gov.in’ या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत मंत्रालयाच्या जाहीर निवेदनात नमूद केलेली नसल्याने इच्छुक कंपन्यांनी संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासणे आवश्यक आहे.

अ‍ॅनिमेशनपासून आभासी वास्तव तंत्रज्ञानापर्यंत

वेव्हएक्स हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नवकल्पना, उद्योजकता आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. चित्रपट तंत्रज्ञानासह अ‍ॅनिमेशन, दृश्य परिणाम (व्हिज्युअल इफेक्ट्स), संगणकीय खेळ, कॉमिक्स आणि विस्तारित वास्तव (एक्स्टेंडेड रिअ‍ॅलिटी) अशा विविध क्षेत्रांतील स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यावर या उपक्रमाचा भर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.