Jawan Nominated Astra Awards Dainik Gomantak
मनोरंजन

SRK च्या 'जवान' चा धमाका; Astra Award मध्ये नॉमिनेट होणार ठरला पहिला भारतीय चित्रपट!

Jawan Nominated Astra Awards: किंग खानच्या सुपर-डूप्पर हिट 'जवान' ने चाहत्यांना वेड लावले आहे.

Manish Jadhav

Jawan Nominated Astra Awards: किंग खानच्या सुपर-डूप्पर हिट 'जवान' ने चाहत्यांना वेड लावले आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. शाहरुख खानचा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या 'पठाण' ने अनेक रेकॉर्ड मोडले. एकंदरीत 2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप लकी ठरले आहे. कारण त्याच्या दोन्ही चित्रपटांनी उत्कृष्ट कलेक्शन केले आहे. 'जवान' ने चित्रपटगृहांमध्येच नव्हे तर ओटीटीवरही धमाका केला आहे. देशभरात प्रसिद्ध मिळवल्यानंतर 'जवान' आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळवत आहे.

बेस्ट फीचर कॅटेगरीमध्ये नॉमिनेट

दरम्यान, शाहरुख खानच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रचंड यश मिळाले आहे. किंग खान आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटाची 'अॅस्ट्रा फिल्म अँड क्रिएटिव्ह आर्ट्स अवॉर्ड'साठी निवड झाली आहे. Astra Awards 2024 मध्ये 'जवान' ला बेस्ट फीचर कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केले आहे. या चित्रपटाला Astra Awards 2024 मध्ये बेस्ट फीचर कॅटेगरीमध्ये स्थान मिळाले आहे.

या चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे

'जवान' शिवाय या कॅटेगरीमध्ये अॅनाटॉमी ऑफ अ फॉल (फ्रान्स फिल्म), काँक्रीट यूटोपिया (दक्षिण कोरिया), फॉलन लीव्हज (फिनलँड), परफेक्ट डेज (जपान), रॅडिकल (मेक्सिको), सोसायटी ऑफ द स्नो यांचाही समावेश आहे. मात्र या यादीत भारतीय चित्रपटांमधील फक्त 'जवान' च्या नावाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, या अवॉर्ड शोच्या विजेत्यांची यादी 26 जून 2024 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये जाहीर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT