Javed Akhta Dainik Gomantak
मनोरंजन

Javed Akhtar: जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा वादंग, 'महिलांनाही द्या एकापेक्षा...'

Controversial Statement: जावेद अख्तर हे आपल्या वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असतात. पण आता जणू त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Controversial Statement: जावेद अख्तर हे आपल्या वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असतात. पण आता जणू त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे. समान नागरी संहितेबाबत बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

समान नागरी संहितेचा अर्थ स्पष्ट केला

एका मुलाखतीत कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ सांगताना जावेद अख्तर (Javed Akhtar) म्हणाले की, 'मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जर मला माझी मालमत्ता द्यावी लागली तर मी त्यांना समान देईन.' जावेद अख्तर पुढे म्हणाले की, 'समान नागरी संहिता हा केवळ सर्व समुदायांसाठी नसून महिला आणि पुरुषांसाठीही कायदा आहे.'

महिलांनाही मिळाला एकापेक्षा जास्त पतींचा अधिकार!

जावेद अख्तर एकीकडे आपल्या बोलण्याने लोकांची मने जिंकतात, तर दुसरीकडे अनेकवेळा त्यांच्या बोलण्याने वादंगही निर्माण होतो. खरे तर यादरम्यान जावेद म्हणाले की, 'जर पुरुषांना एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याचा अधिकार दिला गेला असेल तर महिलांनाही (Women) एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा अधिकार असायला हवा. तसे नसेल तर ही समानता कशी झाली.' या वक्तव्यानंतर काही लोकांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात आवाज उठवल्याचीही चर्चा आहे.

सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. अख्तर यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेकांनी माफी मागण्याची मागणीही केली आहे. सैफ अब्बास नक्वी यांनी जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याला लाजिरवाणे म्हटले आहे. मात्र, अख्तर यांच्या बोलण्याचे समर्थन करतानाही अनेक जण दिसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT