जावेद अख्तर म्हणाले, 'बुल्ली बाई अ‍ॅपच्या मास्टरमाईंडला माफ करा, जर तो...

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी लोकांना मुलीला माफ करण्याचे आवाहन केले आहे.
Javed Akhtar

Javed Akhtar

Dainik Gomantak 

Published on
Updated on

बुली बाय अ‍ॅपच्या वादग्रस्त प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. अटकेनंतर काही वेळातच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी लोकांना मुलीला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

जावेद अख्तर यांनी हे ट्विट केले

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर नेटिझन्सना दया दाखवून मुलीला माफ करण्यास सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, "जर "बुल्ली बाई" अ‍ॅप 18 वर्षीय मुलीद्वारा बनविण्यात आले असून जिने नुकतेच कर्करोग आणि कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत. तर मला वाटते की, महिलांनी तिला भेटले पाहिजे आणि वडिलधाऱ्यांप्रमाणे तिला समजून घेतले पाहिजे. मात्र जे ही तिने केलं ते अगदी चुकीचं केलं. तिच्याप्रतील दया दाखवा आणि तिला क्षमा करा."

<div class="paragraphs"><p>Javed Akhtar</p></div>
मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या Bulli Bai अ‍ॅपवर जावेद अख्तर संतापले

बुल्ली बाई अ‍ॅप काय आहे?

100 मुस्लिम महिलांचे फोटो या अ‍ॅपवर अपलोड करुन त्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात येत होता. आणि लोकांना लिलावात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.

जावेद अख्तर यांनी पंतप्रधानांना का घेरले

हे प्रकरण समोर आल्यानंतर जावेद अख्तर यांनी आपले क्रांतिकारी विचार मांडत एक पोस्ट शेअर केली. ट्विटमध्ये जावेद अख्तर त्यांनी म्हटल की, "साधारण शंभर महिलांचा ऑनलाइन लिलाव केला जातो, तथाकथित धर्म संसद, लष्कर, पोलिस आणि लोकांना सुमारे 200 दशलक्ष भारतीयांच्या हत्याकांडासाठी उकसविण्यात येत आहे. सगळ्यांच्या मौनाने मी हैराण झालो आहे. पंतप्रधान, हा सब का साथ है?"

आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली

18 वर्षीय तरुणीशिवाय, 'बुल्ली बाई' वादाच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या पथकाने बेंगळुरुमध्ये टाकलेल्या छाप्यात 21 वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यालाही पकडले आहे. बुधवारी याच प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com