Japan Earthquake Twitter
मनोरंजन

Japan Earthquake: जपानमधील भूंकपाचा ज्युनिअर एनटीआरला बसला धक्का

Japan Earthquake: तेथील लोकांच्या प्रेमाबद्दल आभारी असून जपानमधील स्थिती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे ज्युनिअर एन टी आर ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Japan Earthquake: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये सर्वात मोठा विध्वंस पाहायला मिळाला. 1 जानेवारी 2024 रोजी जपानमध्ये 18 तासांत सुमारे 155 भूकंप झाले, ज्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेकांची तीव्रता 3 पेक्षा जास्त होती आणि त्सुनामी देखील आली.

दरम्यान, टॉलिवूडचा स्टार अभिनेता ज्युनियर एनटीआर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत त्याचे चाहते चिंतेत होते. पण आता अभिनेत्याने आपण सुस्थितीत असल्याचे अपडेट सोशल मिडियावर शेअर केल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

त्याने एक्स या सोशल मिडियावर पोस्ट करत असे म्हटले आहे की, जपान मधून भारतात परतलो आहे. मात्र जपानमध्ये झालेल्या भूकंपाचा धक्का बसला आहे. गेला संपूर्ण आठवडा मी जपान मध्ये होतो. ज्यांना या भूकंपाचा फटका बसला त्यांच्याप्रति मला सहानुभूती असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे. तेथील लोकांच्या प्रेमाबद्दल आभारी असून जपानमधील स्थिती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे ज्युनिअर एन टी आर ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोमवारी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, ज्युनियर एनटीआरने त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटातील एक फोटो शेअर केला. पोस्टरमध्ये एनटीआर समुद्राच्या मधोमध एका बोटीवर उभा असलेला, शर्ट आणि काळी पँट घालून चेहऱ्यावर गंभीर दिसत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. एनटीआरने इंस्टाग्रामवर चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 'देवरा'चा दुसरा लूक 8 जानेवारीला रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT