kareena kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor: बेबो हॉलीवूडमध्ये जाणार नाही! अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले कारण

Kareena Kapoor: मी माझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये अंतर ठेवते. दोन्ही गोष्टी मी एकमेकात मिसळत नाही.

दैनिक गोमन्तक

Kareena Kapoor: बॉलीवूडची बेबो सध्या भलतीच चर्चेत आहे. मोठ्या गॅपनंतर ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. महत्वाचे म्हणजे, तिचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून करिना तिची सेंकड इनिंग ओटीटीवर करणार आहे.

करिना विजय वर्मा आणि जयदीप अहलावत या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'जाने जान' या थ्रीलर चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बेबो व्यस्त असून या चित्रपटाच्या निमित्ताने ती मुलाखतीदेखील देत आहे.

एका मुलाखतीदरम्यान करिनाला असे विचारले की, जर तुला हॉलीवूडमध्ये जाण्याची संधी मिळाली तर तू जाशील का? त्यावर करिनाने हॉलीवूडची आपल्याला हाव नाही. बॉलीवूडमध्ये सध्या माझ्याकडे अनेक प्रोजेक्ट असल्यामुळे मी बिझी आहे आणि माझी दोन लहान मुले आहेत, मला त्यांना वेळ द्यायचा आहे असे म्हणत हॉलीवूडमध्ये जायचा कोणताही प्लॅन नाही असे म्हटले आहे.

जेह आणि तैमुरची आई असल्याचा फायदा 'जाने जान' मध्ये आईची भूमिका निभावताना झाला का? या प्रश्नावर खास उत्तर दिले आहे. ती म्हणते- मी माझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये अंतर ठेवते. दोन्ही गोष्टी मी एकमेकात मिसळत नाही.

याआधी देखील मी रा-वन या चित्रपटात आईची भूमिका निभावली आहे. मात्र असे होऊ शकते, मी न ठरवता काही गोष्टी आपोआप घडत असतील. त्या भूमिकेसाठी मी इतर काही कष्ट करावे लागत नाही. खऱ्या आईसारखी ती भूमिका सहज निभावली जाते. त्यामुळे जेह आणि तैमुरची आई असल्याचा नक्कीच फायदा झाला असेल असे करिनाने म्हटले आहे.

दरम्यान, करिनाच्या जाने जान चांगलीच चर्चा रंगली आहे. २१ सप्टेंबरला २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. योगायोगाने तिचा त्यादिवशी ४३ वा वाढदिवस आहे. ती या चित्रपटाबद्दल म्हणते, मला आणि सूजॉयला एकत्र काम करायचे होते. मला या थ्रीलर चित्रपटात काम करायचे होते. हा परफेक्ट थ्रीलर असल्याचे करिनाने म्हटले आहे. आता बेबो चा हा चित्रपट लोकांना आवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT