Kashmir Files Controversy|IFFI 2022
Kashmir Files Controversy|IFFI 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Kashmir Files Controversy: 'कश्मीर फाईल्स' वरील टीकेवर इस्रायली राजदूतांनी मागितली माफी

दैनिक गोमन्तक

गोव्यात पार पडलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2022) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला "प्रोपगेंडा म्हटले आहे.

द कश्मीर फाइल्स' ला इफ्फीसारख्या महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. नादव लॅपिड हे गोव्यात (Goa) आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival) मुख्य परीक्षक होते. चित्रपट निर्माते असलेल्या लॅपिड यांनी सोमवारी बोलताना ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत (The Kashmir Files) लॅपिड यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे नाओर यांनी म्हटले आहे. लॅपिड यांच्या विधानामुळे आम्हाला लाज वाटत असल्याचेही नाओर यांनी सांगितल आहे. नाओर गिलोन यांनी म्हटलंय की, भारत (India) आणि इस्रायल या दोन देशांत घनिष्ट मैत्री आहे. तुमच्यामुळे सहन कराव्या लागलेल्या नुकसानानंतरही ही मैत्री कायम राहील. एक माणूस म्हणून मला या प्रकाराबद्दल लाज वाटते. यजमान देशानं उदार मनानं तुमचं स्वागत केलं त्याचे तुम्ही अशा पद्धतीने पांग फेडलेत, त्याबद्दल मी भारताची माफी मागत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT