Irrfan Khan's Son Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Irrfan Khan's Son Viral Video: वडिलांच्या पोस्टरला पाहुन बाबिल झाला भावुक...इरफान खानच्या मुलाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Irrfan Khan's Son Babil Khan Viral Video: आपल्या वास्तववादी अभिनयाने चित्रपटभर आपली छाप सोडणारा बोलक्या डोळ्यांचा अभिनेता इरफान खान कोण विसरु शकेल? 'मदारी', 'लाइफ ऑफ पाय', 'अंग्रेजी मीडियम', 'द लंचबॉक्स', 'करीब करीब सिंगल', 'पीकू' या चित्रपटांचा नजराणा आपल्या चाहत्यांना देऊन अभिनेता इरफान खान हे जग सोडून गेला.

असं म्हणतात कि, कलाकार कधीच मरत नाही. आणि हे खरंच आहे कारण इरफान पुन्हा एकदा पडद्यावर आला. त्याचा 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

अनूप सिंग दिग्दर्शित या चित्रपटात वहिदा रहमान, शशांक अरोरा, सारा अर्जुन यांच्यासह अनेक कलाकार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याचा मुलगा बाबिल खान त्याच्या इरफानच्या पोस्टरला फ्लाइंग किस देताना दिसत आहे.

आज 28 एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता पुण्यतिथीच्या निमित्ताने त्याचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' रिलीज झाला आहे.

नुकताच त्याचा ट्रेलर आला ज्यामध्ये इरफानला एकदा पडद्यावर पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे ओलावले.

 त्याचवेळी त्याच्या मुलानेही त्याचा ट्रेलर त्याच्या इंस्टा वर पोस्ट केला आहे. बाबिल नेहमीच त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. तो गेल्यावर त्याने स्वतःला त्याच्या खोलीत अनेक महिने कोंडून घेतले होते.

आता बाबिल सिनेमागृहात वडील इरफानच्या सिनेमाच्या प्रीमियरला पोहोचला. त्या चित्रपटाचे एक मोठे पोस्टर येथे लावण्यात आले होते आणि त्यावर इरफानचा फोटो होता. ज्याला पाहून बाबिल स्वतःला रोखू शकला नाही. त्याने वडिलांचे चुंबन घेतले. 

पहिल्यांदा त्याने आपला उजवा हात आपल्या ओठांवर ठेवला आणि नंतर त्याच हाताने वडिल इरफान खानच्या फोटोला स्पर्श केला.

त्याची एक छोटीशी कृती बरंच काही सांगून जात होती की आजही त्याला आपल्या वडिलांची किती आठवण येते. हे पाहिल्यानंतर आता लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT