Irrfan Khan| The Song Of Scorpions Dainik Gomantak
मनोरंजन

Irrfan Khan: इरफान खानचा शेवटचा चित्रपट या दिवशी होणार रिलीज; लेकाने शेअर केले पोस्टर

इरफान खानचा चित्रपट 'द साँग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Irrfan Khan: इरफान खानचा चित्रपट 'द साँग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होत आहे. अभिनेत्याचे चाहते आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट सिनेमागृहात पाहू शकतील.

इरफानच्या या चित्रपटाची माहिती त्याचा मुलगा बाबिलने सोशल मीडियावर दिली. बाबिलने त्याच्या वडिलांच्या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले असून चित्रपटाचा ट्रेलर हिंदीमध्ये रिलीज करण्यात आल्याचे सांगितले आहे.

  • चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चाहते झाले आनंदी

    सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लिहिले की, 'इरफान आम्हाला नेहमीच तुझी आठवण येते. अजून एका युजरने लिहिले की, 'तो किती महान अभिनेता होता, आज तो दुसऱ्या दुनियेत आहे, तरीही या जगात चमकतोय.' दुसरा म्हणाला- मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, चित्रपट थेटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य होता.'

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इरफानच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना बाबिल खानने लिहिले की, 'द साँग ऑफ स्कॉर्पियन' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

इरफानचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' सुमारे 6 वर्षांपूर्वी 2017 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट स्विस-फ्रेंच-सिंगापूर भाषेत बनवण्यात आला होता. पण आता तो हिंदी भाषेत रिलीज होत आहे.

यामुळेच लोक याला इरफानचा शेवटचा चित्रपट म्हणत आहेत. या चित्रपटात इरफान खान व्यतिरिक्त गोलशिफतेह फराहानी, वहिदा रहमान आणि शशांक अरोरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT