Gippy Grewal Dainik Gomantak
मनोरंजन

भारताने पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालवर पाकिस्तानात जाण्यास घातली बंदी

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याची गाणी पंजाबी चार्टबस्टर्समध्ये येताच धूमाकूळ घालतात. परंतु त्याच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, त्याला पाकिस्तानला (Pakistan) जाण्यापासून रोखण्यात आले आहे. भारतीय गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला (Gippy Grewal) शुक्रवारी अटारी बॉर्डरवर भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखल्यानंतर वाघा सीमेवरुन पाकिस्तानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. (India Bans Punjabi Singer Gippy Grewal From Entering Pakistan)

इव्हॅक्यूई प्रोप्रायटरी ट्रस्ट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिप्पी करतारपूरला जात असताना सीमेवर त्याच्या स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. “तो सकाळी 9:30 वाजता करतारपूर (Narowal) ला जाणार होता आणि दुपारी 3:30 वाजता लाहोरला (Lahore) परतणार होता. त्यानंतर गव्हर्नर हाऊसमधील रिसेप्शनला गिप्पी उपस्थित राहणार होता. 29 जानेवारीला भारतात परतण्यापूर्वी ते नानकाना साहिबलाही भेट देणार होता.

अटारी चेकपोस्टवर गिप्पी ग्रेवाल आले थांबविण्यात

सूत्रानुसार, गिप्पी ग्रेवाल सहा किंवा सात इतर लोकांसह वाघा बॉर्डरमार्गे दोन दिवसांता पाकिस्तान दौरा करणार होता, परंतु त्याला अटारी चेक पोस्टवर थांबवण्यात आले. त्याने सांगितले की, "मला लाहोरमधील गुरुद्वारा दरबार साहिबलाही जायचे होते आणि त्यानंतर गव्हर्नर हाऊसमध्ये बैठकीसाठीही उपलब्ध रहावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी तो शीख धर्मस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी नानकाना साहिबला रवाना होणार होता. सूत्रांनी पुढे सांगितले की, गिप्पी ग्रेवाल दोन्ही बाजूंच्या जॉइंट फिल्म वेंचरवर चर्चा करण्यासाठी गव्हर्नर हाऊसमध्ये चित्रपट दिग्ददर्शकाबरोबर चर्चा करणार होता.

सूत्रांनी पुढे सांगितले की, ग्रेवालने शेवटच्या वेळी करतारपूरला भेट दिली, तेव्हा लोकांशीही संवाद साधला होता. त्याचबरोबर पाकिस्तानी लोकांबद्दल आणि त्याने भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल उत्साह, जिव्हाळा आणि प्रेम दाखवले होते. त्याच्या या दौऱ्याला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भरभरुन कव्हरेज दिले होते. मिस्टर ग्रेवालची पाकिस्तानमध्ये चांगलीच लोकप्रियता आहे. विशेषत: पंजाबी प्रेक्षकांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची लोकप्रियता मोठी आहे. त्याचे 'कॅरी ऑन जुट्टा' आणि 'लकी दी अनलकी स्टोरी' सारखे चित्रपट लोकप्रियतेच्या चार्टमध्ये शीर्षस्थानी आहेत.

पाकिस्तानी चित्रपट आणि थिएटर बिरादरींनी केला निषेध

पाकिस्तानमधील चित्रपट आणि थिएटर समुदायाने गिप्पी ग्रेवालला रोखल्याबद्दल भारतीय अधिकाऱ्यांचा निषेध केला. कॉमेडियन इफ्तिखार ठाकूर म्हणाले की, ''कलाकार नेहमीच दोन राष्ट्रांमधील संवादाचे माध्यम बनू शकतात. ते पुढे म्हणाले, 'ग्रेवालला अशाप्रकारे पाकिस्तानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले, हे अतिशय दुःखद आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT