IFFI Goa 2021: Inspirational films based on sports in the sports department
IFFI Goa 2021: Inspirational films based on sports in the sports department Dainik Gomantak
मनोरंजन

सिनेमांतून वाढणार खिलाडूवृत्ती..!

दैनिक गोमन्तक

पणजी : यावर्षीच्या इफ्फीमध्ये (IFFI Goa 2021) क्रीडा (Sports) विभागातील खेळावर आधारित चार प्रेरणादायी चित्रपट दाखवले जाणार आहेत. जागतिक (International) स्तरावर क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होत असताना, खेळावर आधारित चित्रपटांनी नेहमीच खरी जिद्द, दृढनिश्चय, सळसळते चैतन्य आणि सौहार्द यांचं चित्रणाने सिनेप्रेमींना आकर्षित केले आहे.

त्याचवेळी, भारताने या वर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदकतालिकेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली असून हे भारतीय खेळांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहेत. पडद्यावर खेळाचे हे वैभव साजरे करण्यासाठी यंदा इफ्फी सिनेप्रेमींसाठी क्रीडाविषयक चार आंतरराष्ट्रीय चित्रपट घेऊन येत आहे.

लिवेन व्हॅन बेलेनचा, रुकी (डच), जेरो युनचा, फायटर (कोरियन), मॅसीज बार्कझेव्स्कीचा, द चॅम्पियन ऑफ ऑशविट्झ (जर्मन, पोलिश) आणि एली ग्रॅपे यांचा ओल्गा (फ्रेंच, रशियन, युक्रेनियन) हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

७५ तरुणांना इफ्फीचे आवतण

‘इफ्फी’च्या इतिहासात प्रथमच नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आणि सर्जनशील प्रतिभा असलेली ७५ व्यक्तिमत्त्वे गोव्यात होत असलेल्या ५२ इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत सुरू करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम देशातील नावनिर्मितीक्षम तरुण कलाकारांना आणि उमलत्या प्रतिभांना ओळखून त्यांना आणखी बहरण्याची संधी देईल. या उपक्रमासाठी निवडलेली ‘उद्याची ७५ सर्जनशील मने’ गोव्यात होत असलेल्या २०२१ सालच्या इफ्फीचा भाग असतील आणि त्यांना सर्व तज्ज्ञ वर्गांमध्ये तसेच संवादात्मक चर्चा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल तसेच इतर अनेक उपक्रमांसह चित्रपट उद्योगातील आघाडीच्या व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करता येणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी २२ ऑक्टोबर रोजी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, इफ्फीची ५२वी आवृत्ती भारतभरातील उमलत्या युवा प्रतिभांना चित्रपट निर्माते आणि या उद्योगाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देईल देशभरात घेण्यात आलेल्या एका स्पर्धेद्वारे या उपक्रमात सहभागी होणार्‍या युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातून ४०० पेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले होते.

‘अहेद्स नी’

नादव लॅपिड दिग्दर्शित, हिब्रू चित्रपट ‘अहेद्स नी’ ही एका इस्रायली चित्रपट निर्मात्याची कथा आहे. वाळवंटाच्या अगदी टोकावर असलेल्या त्याच्या दुर्गम गावात त्याला आपला एक चित्रपट सादर करायचा आहे. त्याच्या संघर्षाची ही कथा आहे.

कोस्टा ब्रावा, लेबनॉन

कोस्टा ब्रावा, लेबनॉनमधील एका मुक्त-उत्साही बद्री कुटुंबाची ही कथा आहे. त्यांच्या अस्तित्वालाच धोका असलेल्या परिस्थितीच्या तावडीतून सुटण्यासाठीची. कोस्टा ब्रावा, लेबनॉन, मूनी अकलचा हा अरबी चित्रपट आहे.

‘युनी’ : कमिला एंडिनीचा युनी हा इंडोनेशियन चित्रपट एका हुशार आणि महत्त्वाकांक्षी किशोरवयीन मुलीची कथा चित्रित करतो. युनीचे विद्यापीठात जाण्याचे आणि आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न आहे. तथापि, तिला सामाजिक दबावावर मात करण्यासाठी तसेच तिच्या आणि स्वप्नांमध्ये उभ्या असलेल्या मिथकांना दूर करण्यासाठी अनंत संघर्षांचा सामना करावा लागतो.

व्हील ऑफ फॉर्च्यून ॲण्ड फँटसी

प्रेमात पडलेल्या स्त्रिया, ज्यांचे जीवन योगायोगाच्या रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफलेले असते, त्यामुळे त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणखी वाढते. भाग्य आणि कल्पनारम्यता यांच्या विलक्षण परस्पर संवादात स्वतःला मग्न करण्यासाठी जपानी दिग्दर्शक रयुसुके हामागुची यांचा व्हील ऑफ फॉर्च्यून ॲण्ड फॅन्ट्‍सी पहा.

व्हेदर द वेदर इज फाइन

वादळाने उद्ध्वस्त केले, परंतु जगण्याचा निर्धार केला. ‘व्हेदर द वेदर इज फाइन’ हा चित्रपट फिलिपिनो किनारपट्टीवरील टॅक्लोबान शहरात एका मुलाच्या आणि त्याच्या आईच्या जगण्याची कहाणी सांगतो. नोव्हेंबर २०१३ मध्ये हैयान या वादळाच्या प्रभावानंतर ते राहतात ते शहर मोठ्या प्रमाणात ढिगाऱ्यांखाली गेले आहे. वारे भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शन कार्लो फ्रान्सिस्को मनाताड यांनी केले आहे. वारे ही ऑस्ट्रोनेशियन भाषा आहे आणि फिलीपिन्सची पाचवी-सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक प्रादेशिक भाषा आहे.

‘सोल ऑफ आशिया’मधील सिनेमांची ओळख

यंदाच्या इफ्फीमध्ये विविध आशियाई देशांमधून निवडलेले, सहा चित्रपट इफ्फी ५२च्या ‘सोल ऑफ एशिया’ विभागाअंतर्गत प्रदर्शित केले जातील. या विशेष विभागात ज्या चित्रपटांना स्थान मिळाले ते म्हणजे अहेद्स नी, कॉस्टा ब्रावा, लेबनॉन, ऑनोडा : १०,००० नाईट्स इन द जंगल, व्हील ऑफ फॉर्च्युन ॲण्ड फँट्‍सी, व्हेदर द वेदर इज फाइन आणि युनी. यापैकी दोन चित्रपट जपानी भाषेत आहेत आणि अन्य हिब्रू, अरबी, वारे आणि इंडोनेशियन भाषेतील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT