Hrithik Roshan Dainik Gomantak
मनोरंजन

हृतिक रोशनचा 'Fighter' मोड ऑन; बनवली जबरदस्त बॉडी

हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येणार आहे.

दैनिक गोमन्तक

हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या आगामी चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येणार आहे. हृतिक रोशन इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतो तसेच तो रोज काही ना काही फोटो शेअर करत असतो. यावेळी हृतिकची ही लढाऊ शैली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर हृतिकने चाहत्यांसाठी फोटो शेअर केल आहे त्यामध्ये तो त्याच्या ट्रेनरसोबत धावताना दिसून येत आहे. (Hrithik Roshan is gearing up for his upcoming film Fighter)

शर्टलेस असल्याने हृतिक रोशन त्याची बॉडी आणि अॅब्स दाखवताना फोटोमध्ये दिसत आहे. हृतिक स्वत:मधील फायटर मोड जागा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हृतिक रोशनला लवकरच पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी मनोरंजक असेल. तसेच हृतिक रोशनच्या फायटर चित्रपटातील काहीसा अॅक्शन भाग या फोटोमध्ये आपल्याला दिसून येत आहे.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन हा बॉलिवुड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. एक ठोस परफॉर्मर असण्यासोबतच, हृतिक फिट आणि सेक्सिस्ट अभिनेता आहे. अलीकडे, तो त्याच्या आगामी फायटर चित्रपटासाठी तयारी करत आहे. हृतिकने नुकतेच विक्रम वेधचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि आता तो त्याच्या आगामी फायटर चित्रपटाच्या शूटिंग मध्ये सामील झाला आहे.

अलीकडेच हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडियावर स्वतःची काही थ्रोबॅक छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये अभिनेता त्याच्या ट्रेनरसोबत त्याच्या फायटर चित्रपटाची तयारी करताना दिसून येत आहे. या फोटोंमध्ये हृतिक सुपर टोन्ड दिसत आहे आणि त्याच्यापासून सर्वांची नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "@krisgethin तुम्ही तयार आहात का? #Fighter मोड परत आणावा लागेल तसेच फायटर व्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या बहुप्रतिक्षित रिलीज विक्रम वेधाच्या थिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT