Hrithik Roshan Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Fighter Movie Release Date: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ची रीलीज डेट घोषित

भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट; अनिल कपुरचीही महत्वाची भूमिका

गोमन्तक डिजिटल टीम

Fighter Movie Release Date: भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम 18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट 'फायटर' 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट साकारणार असून, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

भारतातील सर्वात मोठे अ‍ॅक्शनपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, 'फायटर'च्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्याच्या खुर्चीत बसत आहेत. या चित्रपटाला भव्य व आकर्षक बनवण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली असून, प्रेक्षकांना सेल्युलॉइडवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे एक सुवर्णयोग असणार आहे.

'फायटर' हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. निर्माता आणि व्हायकॉम 18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांचा भारतीय मूळ असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्शन चित्रपट निर्माण करून जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे.

हृतिक आणि दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवरच चित्रपटाची नवी रीलीज डेट दिलेली आहे. खरेतर हा चित्रपट पुढच्याच वर्षी म्हणजेच 2023 च्याच प्रजासत्ताक दिनी येणार होता. मात्र शाहरूख खान-दीपिका पदुकोनच्या बहुप्रतिक्षीत 'पठाण' या चित्रपटासाठी 'फायटर'ची रीलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हे दोन्ही चित्रपट यशराज बॅनरने बनवले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT