Angelina Jolie  Dainik Gomantak
मनोरंजन

Angelina Jolie : "त्यानंतरचं आयुष्य असं होतं"... ब्रॅड पिटसोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली अँजोलिना

हॉलीवूडचं जगप्रसिद्ध जोडपं ब्रॅड पिट आणि अँजोलिना जोलीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अँजोलिना या निर्णयावर व्यक्त झाली आहे.

Rahul sadolikar

Maleficent, Original Sin, Mr. & Mrs. Smith यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक अनोखा नाट्यात्मक अनुभव देणारी अभिनेत्री आपल्या वेदनादायी भूतकाळाबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

बरोबर आम्ही बोलत हॉलीवूड अभिनेत्री अँजोलिना जोलीबद्दल. पती अभिनेता ब्रॅड पिटसोबत विभक्त झाल्यानंतर अँजोलिनाने पहिल्यांदाच आपल्या वेदनादायी अनुभवांना माध्यमासमोर मांडले आहे. चला पाहुया सविस्तर वृत्त

पती ब्रॅड पिटपासून विभक्त झाली

पती ब्रॅड पिटपासून विभक्त झाल्यानंतर अँजेलिना जोलीने तिचे मातृत्व आणि घटस्फोटानंतरचे आयुष्य याविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

ब्रॅडशी झालेल्या घटस्फोटानंतर तिने अलिकडच्या वर्षांत तिला आणि तिच्या मुलांना कसा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला याबद्दल सांगितले आहे.

मुलांनी मला वाचवले

महिलांविषयीचे प्रसिद्ध मासिक वोगला दिलेल्या मुलाखतीत, अँजोलिनाने पिटसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या मुलांचे संगोपन आणि संगोपन करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

अँजोलिना म्हणाली “मी आई झाली तेव्हा मी 26 वर्षांची होते. माझे संपूर्ण आयुष्य बदलले. मुलांनी मला वाचवले आणि मला या जगात वेगळ्या पद्धतीने राहायला शिकवले,”

“मला वाटतं, अलीकडे, जर मला त्यांच्यासाठी जगायचं नसतं तर मी खूप गडद मार्गाने गेले असते.

अँजोलिना आणि ब्रॅड

जोली आणि पिट यांची पहिली भेट हॉलिवूड चित्रपट “मिस्टर. & मिसेस. स्मिथ". लग्न केल्यानंतर, ते 2016 मध्ये वेगळे झाले.

या जोडप्याला मॅडॉक्स, पॅक्स, झहारा, शिलो आणि जुळी मुले विव्हिएन आणि नॉक्स अशी सहा मुले आहेत.

आज अँजोलिना कशी जगते?

जोलीने 48 व्या वर्षीही ती कसं आयुष्य जगते हे देखील शेअर केले. अँजोलिना या मुलाखतीत बोलताना पुढे म्हणाली “मी 48 व्या वर्षी कोण आहे हे मला अजूनही समजत आहे. मला वाटते की मी एक व्यक्ती म्हणून संक्रमणात आहे.."

हा फॉरवर्ड-फेसिंग आहे

आपल्या आयुष्याची पुढची दिशा स्पष्ट करताना अँजोलिनाने तिचे पुढच्या योजनाही सांगितल्या. उल्लेखनीय म्हणजे, जोली व्होग मासिकाच्या नोव्हेंबर 2023 आवृत्तीच्या मुखपृष्ठावर दिसणार आहे. 

तिच्या नवीन फॅशन कंपनी, Atelier Jolie बद्दल बोलताना ती म्हणाली, “मला मोठे फॅशन डिझायनर व्हायचे नाही, मला इतर लोकांसाठी घर बांधायचे आहे. मला माझ्या आयुष्यातील अनेक पैलू बदलण्याची आशा आहे. आणि हा फॉरवर्ड-फेसिंग आहे.”

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT