Hollywood actor Tom Cruise visits Asha Bhosle's restaurant
Hollywood actor Tom Cruise visits Asha Bhosle's restaurant  Dainik Gomantak
मनोरंजन

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने दिली आशा भोसलेंच्या हॅाटेलला भेट; घेतला चिकनचा आस्वाद

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी सोमवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टॉम क्रूझचा (Tom Cruise) एक फोटो शेअर केला. त्यानंतर टॉम क्रूझचे हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे, कारण यात तो आशा भोसले यांच्या रेस्टॉरंटमधून जेवण करून बाहेर आला होता. टॉम क्रूझ चिकन टिक्का खाण्यासाठी आशा भोसले यांच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता. टॉम क्रूझ सध्या बर्मिंघममध्ये त्याच्या आगामी 'मिशन: इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

टॉम क्रूझचे फोटो शेअर करताना आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'टॉम क्रूझ यांना आशा (बर्मिंघम) येथे जेवताना आनंद झाला हे जाणून मला खूप आनंद झाला. मी त्यांना पुन्हा या रेस्टॉरंटमध्ये पाहण्यास उत्सुक आहे. गायिका आशा भोसले यांनी एक लिंकही पोस्ट केली, ज्यात उघड झाले की टॉमने त्याच्या नवीन चित्रपट 'मिशन: इम्पॉसिबल 7' च्या शूटिंगमधून ब्रेक घेताना 21 ऑगस्ट रोजी शहरातील रेस्टॉरंटला भेट दिली.

टॉम क्रूज पुढे 'टॉप गन: मॅव्हरिक' मध्ये दिसतील. जे त्याच्या 1986 च्या प्रसिद्ध ॲक्शन ड्रामा 'टॉप गन' चा सिक्वेल आहे. 59 वर्षीय अभिनेता टॉम क्रूझने भारतीय खाद्यपदार्थ चाखले. टॉम क्रूझने चिकन टिक्का मसालाच्या दोन प्लेट्स मागवल्या, ज्या त्याला आवडल्या आणि त्याने त्या डिशचे कौतुकही केले. आशा भोसले यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

Margao News : सुरक्षेअभावी औद्योगिक अपघात; नवीन औद्योगिक धोरणामध्ये घातक प्रकल्‍पांना थारा न देण्‍याकडे कल

Amit Shah: शेअर बाजारातील घसरणीवर अमित शाह स्पष्टच बोलले; 4 जूननंतर....!

Netravali: नेत्रावळीत शिकारीचा संशय; कदंबचे 'ते' 16 कर्मचारी जामिनानंतर सेवेतही रुजू

SCROLL FOR NEXT