Happy Birthday Salman Khan
Happy Birthday Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या भाईजानबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि 'दबंग' अभिनेता सलमान खान आज त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला वाढदिवसानिमित्त चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वाचे मनं जिंकले आहे. पण आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक फॅन आहेत.

सलमान खानचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान आहेत. सलमानचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. सलमान खानला अरबाज आणि सोहेल खान हे दोन भाऊ, तर, अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणीही आहेत.

सलमान खान हा बॉलिवूडच्या (Bollywood) प्रसिद्ध लेखकाचा मुलगा असला तरी त्याने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 'बीवी हो तो ऐसी' हा सलमान खानचा (Salman Khan) पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. इतकच नाही तर, या चित्रपटासाठी त्याला अवघं 75 रुपये मानधन मिळाले होते. यानंतर सलमानकडे बरेच दिवस काम नव्हते आणि त्यानंतर अचानक त्याचे नशीब चमकले.

सलमानला सूरज बडजात्याच्या रोमँटिक चित्रपट 'मैंने प्यार किया'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने सलमान खाना नवी ओळख मिळाली. दोघांच्या या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर असा धुमाकूळ घातला की, सर्वांनाच त्यांचे वेड लागले होते. सलमानचा हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. यासाठी सलमान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

बॉलिवूडच्या या ‘दबंग’ अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत असते. कधी 'हिट अँड रन' प्रकरणात, तर कधी काळवीट शिकार प्रकरणात भाईजानला तुरुंगात जावे लागले आहे. पण असे असूनही त्याच्या लोकप्रियतेत किंचितशीही घट झाली नाही. पहिल्या चित्रपटासाठी अवघे 75 रुपये घेतलेला सलमान खान आजघडीला कोट्यवधींची कमाई करतो.

'मैने प्यार किया', 'सनम बेवफा', 'साजन', 'हम आपके है कौन', 'करण अर्जुन', 'जुडवा', 'प्यार किया तो डरना क्या', 'बीवी नंबर वन', 'हम दिल दे चुके सनम', 'नो एंट्री', 'पार्टनर', 'वॉन्टेड', 'दबंग', 'रेडी', 'बॉडीगार्ड', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा' है’, 'दबंग 2', 'किक', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'रेस', ‘राधे’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT