Happy Birthday Radhika Apte: Know about her filmy carrier, personal life and marriage Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Radhika Apte: म्हूणन.. स्वतःच्याच लग्नात घातली तिने फाटकी साडी

राधिका आपटेच्या (Radhika Apte) लग्नाची कथाही खूप वेगळी आहे. तिने 2012 मध्ये परदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी(Benedict Taylor)अगदी गुपचूपपणे लग्न केले.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आपल्या शानदार अभिनयाने लाखो चाहते आपलेसे केले आहेत. ती एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या बोल्ड (Bold) आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे, तिचे लाखो चाहते आहेत जे तिच्या अभिनयावर पुरते घायाळ आहेत. (Happy Birthday Radhika Apte: Know about her filmy carrier, personal life and marriage)

राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला. तिचे चित्रपटांतील पदार्पण देखील खूप रंजक आहे. जेव्हा राधिका शास्त्रीय नृत्य 'कथक' शिकत होती, यावेळी एका कास्टिंग डायरेक्टरने तिला पाहिले आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. राधिका 2005 मध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) सोबत 'वाह लाइफ हो तो ऐसी' (Vaah! Life Ho Toh Aisi!) चित्रपटात पहिल्यांदा दिसली.या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती, पण राधिका इथेच थांबली नाही. यानंतर ती बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसली. यानंतर तिने 'रक्त चरित्र' (Raktcharitr), 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी'(Shor in the city), 'बदलापूर'(Badlapur), आणि 'हंटर'(Hunter) सारखे चित्रपट केले. 'मांझी' चित्रपटात तिने साकारलेल्या 'फागुनिया' या पत्राचे तर खूप कौतुक झाले.

परदेशी संगीतकाराशी गुप्तपणे लग्न

राधिका आपटेच्या लग्नाची कथाही खूप वेगळी आहे. तिने 2012 मध्ये परदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी(Benedict Taylor)अगदी गुपचूपपणे लग्न केले. राधिकाने एक वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली. दोघे 2011 साली भेटले जेव्हा ती लंडनला कंटेम्परेरी डांस शिकण्यासाठी गेली होती.

राधिकाने लग्नात जुनी साडी का घातली होती?

राधिका आपटेच्या लग्नाशी संबंधित आणखी एक रोचक कथा आहे. फाटलेली जुनी साडी नेसून राधिका तिच्या लग्नाला गेली. एका मुलाखतीदरम्यान, राधिकाने सांगितले होते की, 'माझे नोंदणीकृत लग्न होते, या दिवशी मी माझ्या आजीची जुनी साडी परिधान केली होती. या साडीला अनेक छिद्रे होती. पण तरीही मी तीच साडी नेसण्याचा निर्णय घेतला.कारण मी माझ्या आजीच्या खूप जवळ होते , ती माझी आवडती व्यक्ती होती . माझ्या लग्नावर फक्त कपड्यांवर भरपूर पैसा खर्च करणाऱ्यांपैकी मी नाही. राधिकाने सांगितले की त्यानंतर तिने पूर्ण रीतीरिवाजाने लग्न केले, ज्यासाठी तिने एक नवीन पोशाख खरेदी केला. कारण मला त्या दिवशी चांगले दिसायचे होते.असेही तिने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT