Grotowski Poor Theater in Goa

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

गोव्यातील ग्रोटोव्स्कीचे ‘पुअर थिएटर’

जागतिक नाट्य मंचावर आज ग्रोटोव्स्की आधुनिक महान नाट्यदिग्दर्शकांपैकी एक आणि प्रायोगिक नाट्य चळवळीचा एक महत्त्वपूर्ण प्रणेता म्हणून ओळखला जातो

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या (Goa) नाट्यक्षेत्रात अभ्यासपूर्वक वेगवेगळे उपक्रम सातत्याने चालवणारा केतन जाधव कलकत्ता येथे चलणाऱ्या नाट्यविषयक कार्यशाळेत ग्रोटोव्स्किच्या नाट्यतंत्राची माहिती करून घेतो आहे.

काय आहे हे ग्रोटोव्स्कीचे नाट्यतंत्र?

जागतिक नाट्य मंचावर आज ग्रोटोव्स्की आधुनिक महान नाट्यदिग्दर्शकांपैकी एक आणि प्रायोगिक नाट्य चळवळीचा एक महत्त्वपूर्ण प्रणेता म्हणून ओळखला जातो. ‘पुअर थिएटर’ (अल्प साधनांचे थिएटर) ही त्याने सर्वपरिचित केलेली संकल्पना. ग्रोटोव्स्कीचे तंत्र शालेय विद्यार्थ्यांना देखील सहज समजू शकेल असे आहे. ‘पुअर थिएटर’ कोणत्याही (मोकळ्या) जागेत सादर होऊ शकते. म्हणून नाट्यक्षेत्रात प्रयोगशील असणाऱ्या आणि अल्प साधने वापरून काम करणाऱ्या कुठल्याही नाट्यकर्मी किंवा नाट्यसंस्थेला ग्रोटोव्स्कीचे नाट्यतंत्र आपले वाटते.

या नाट्य तंत्राबद्दल अधिक सांगताना केतन म्हणतो, ‘आपल्या गोव्यात (Goa) ग्रोटोव्स्की हे नाव जरी अनोळखी असले तरी त्याने रूढ केलेले तंत्र अनेकांकडून अनावधानाने स्वीकारलेही गेले आहे. गोव्यात ‘हंस थिएटर ट्रेनिंग सेंटर’ चालवत असलेल्या विजयकुमार यांच्या’ ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर’ मध्ये आपल्याला त्याचाच दृष्टिकोण आढळेल. ‘पुअर थिएटर’ शैलीतून ग्रोटोव्स्कीने रंगमंचाला अवडंबरापासून मुक्त केले. भव्य पोशाख व तपशीलवार वास्तववादी नेपथ्य यापासून सुटका दिली. या शैलीत अभिनेत्याच्या कौशल्यालाच अधिक महत्त्व असते. अवघ्या सामुग्रीच्या मदतीने नाटकाचे सादर होणे ही जणू या प्रकारच्या शैलीची एक अलिखित अटच आहे. काही वर्षांपूर्वी ‘हंस’ चालवत चालवलेला ‘घर घर नाटक’ हा उपक्रम, ज्यामधून मर्यादित पण समंजस प्रेक्षकांसमोर एखाद्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत नाटक सादर व्हायचे, तो ‘पुअर थिएटर’चाच एक प्रकारचा आविष्कार होता.

लोकनाट्याची महान परंपरा असलेल्या आपल्या देशात जरी अशा मोकळ्या जागा अथवा मंदिरे यांना नाटक सादरीकरणाचे वावडे नसले तरी एक प्रकारे मुख्य प्रवाहात लोकनाट्य रुजण्यास बरीच आडकाठी होती. पाश्चिमात्य देशात ग्रोटोव्स्कीने स्वतःला रंगमंचाच्या मुख्य प्रवाहातून तोडून प्रस्थापित नाट्यग्रहाँऐवजी इमारती आणि खोल्यांमधून नाटके (Drama) सादर करण्याला करण्याला प्राधान्य दिले. नाटकात घडणाऱ्या दृश्यांभोवती विविध कोनाने त्याने प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली.

अर्थात केवळ नेपथ्य, पोशाख अथवा रंगमंच सामुग्री यावर मर्यादा घालून ‘पुअर थिएटर’ सादर होते असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरेल. कारण या तंत्रात, नाटकाच्या सादरीकरणात अभिनेत्यांवर फार मोठी जबाबदारी असते. त्यांच्याकडून त्यांच्या शारीरिक व आवाज इत्यादींच्या क्षमतेबद्दल मोठी अपेक्षा हे तंत्र ठेवते कारण अशा प्रकारच्या सादरीकरणातून नाटकाचा आशय त्यांच्याच अभिव्यक्तीद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावयचा असतो. ग्रोटोव्स्की आपल्या अभिनेत्यांकडून विस्तृत आणि कठोर अशा शारीरिक प्रशिक्षणाची अपेक्षा ठेवतो. आपल्या ‘दशावतारी’ या नाट्य प्रकारात जसा विधींच्या भागाचा समावेश असतो तशाच विधियुक्त घटकांचा समावेश ग्रोटोव्स्की त्याच्या नाट्यतंत्रात करतो. ‘नाटक’ (Drama) या प्रकारची सारी पारंपारिक सौंदर्यशास्त्रीय मूल्ये ग्रोटोव्स्की ने आपल्या या तंत्राद्वारे बदलून टाकली.

कलकत्त्यात चालणाऱ्या या ‘ग्रोटोव्स्की तंत्र’ कार्यशाळेचे आयोजन ‘मिलन मेळा’ या संस्थेने केले आहे. 1970 च्या काळात प्रत्यक्ष ग्रोटोव्स्कीचे शिष्य राहिलेले अबानी विश्वास हे या कार्यशाळेचे संचालक आहेत. चाळीस दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येक दिवशी 15 ते 17 तासांच्या कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. गायन, नैसर्गिक चाल, कलारीपयट्टू, छाऊ नृत्य इत्यादी माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण चालू आहे. याच दरम्यान शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या नाटकावरही त्यांचे काम चालू आहे

या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या गोव्याच्या (Goa) केतन जाधवने त्याच्या काणकोणमधील पैंगीण या गावात ‘थिएटर फ्लेमिंगो ॲक्टर लॅब’द्वारा नाट्यशास्त्रात अधिक अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभिनेत्यांसाठी विशेष अवकाश तयार केला आहे जिथे त्यांच्या नाट्य कार्यशाळा नियमितपणे सुरूच असतात. केतन पुण्याच्या ललित केंद्राच्या सुवर्णपदकाचा मानकरी विद्यार्थी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT