Anil Sharma on Seema Haider Dainik Gomantak
मनोरंजन

Anil Sharma on Seema Haider: सीमा हैदरच्या प्रकरणावर गदर दिग्दर्शक म्हणाले ही तर...

भारतातल्या आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण सध्या खूपच गाजतंय.

Rahul sadolikar

सध्या गदर 2 सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होतोय. गदर सिनेमात आपण पाहीलं की तारा सिंग सकीनासाठी भारत सोडून पाकीस्तानात जातो.

गदर मध्ये घडणारी अशीच गोष्ट खऱ्या आयुष्यात घडलीय. आपल्या प्रियकरासाठी एक तरुणी पाकीस्तानातून भारतात आल्याची गोष्ट घडलीय. ही गोष्ट जेव्हा गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मांना समजली तेव्हा ते काय म्हणाले पाहूयात...

आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तान सोडले

पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर या आपल्या प्रेमासाठी सध्या चर्चेचा भाग बनल्या आहेत. प्रेमापोटी सीमाने आपले राहते घर, राहता देश सोडला.. सीमाची कथा चित्रपटापेक्षा कमी नाही. "सीमाची गोष्ट मला गदरची आठवण करून देते.

तारा सिंह पत्नी आणि मुलासाठी पाकिस्तानात कसे गेले. सीमाला गदरचा तारा सिंग मानतो, असं गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा सीमाबद्दल बोलतात.

सीमाचं केलं कौतुक

Aaj Tak ला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा यांनी सीमा हैदर आणि गदर यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी सीमाचे कौतुक करत ती खूप धाडसी असल्याचे सांगितले.

आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी ती भारतात आली होती. तिथेच भारतातल्या मुलाने सीमाला मुलांसह स्वीकारले. प्रेमासाठी ती एवढी लांब आली आहे, तिचे इथे स्वागतच व्हायला हवे.

अनिल शर्मा म्हणतात

अनिल शर्मा यांनी सीमाला लेडी तारा सिंह म्हटले. अनिल शर्मा म्हणतात- मी त्या मुलीला तारा सिंगची महिला आवृत्ती म्हणेन. तिची हिंमत इतकी होती की ती कोणाचीही पर्वा न करता इथे आली. हे सोपे नाही.

चित्रपट पाहिल्यानंतर कदाचित तो फक्त प्रेमात पडला नसेल, तर चित्रपट पाहिल्यानंतर त्याला तारा सिंग यांच्याकडून हिंमत मिळाली असावी. ते करू शकतात तर मी का नाही करू शकत. असं तिला वाटेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT