Gadar 2 Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Gadar 2 Upcoming Movie: गदरमधल्या तारा सिंगचा मुलगा चरणजित आता काय करतो हे माहीतेय का?

Gadar 2 Upcoming Movie: चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि काही गाण्यांच्या रिलिजनंतर प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Gadar 2 Upcoming Movie: सनी देओल गदर 2 मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 11 ऑगस्टला हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 22 वर्षापूर्वी गदर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता गदर 2 कडून देखील अशीच अपेक्षा ठेवली जात आहे.

गदर मधील काही कलाकार सनी देओल, अमिषा पटेल हे तर गदर 2 मध्ये देखील दिसत आहेत. तारा सिंग, सकिना आणि त्याचा मुलगा चरणजित सिंग यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. परंतु हा गदर मध्ये दिसलेला चरणजित आत्ता काय करतो हे तुम्हाला माहीत आहे का?

चरणजित सिंगच्या भुमिकेत दिसलेल्या मुलाचे नाव उत्कर्ष शर्मा असे असून तो प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. 1994 साली जन्मलेल्या उत्कर्षने बालकलाकार म्हणून 'गदर: एक प्रेम कथा' या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर 'जिनिअस' या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली आहे.

महत्वाचे म्हणजे उत्कर्ष शर्माने 22 वर्षाआधी ज्या चित्रपटात बालकलाकार म्हणून चरणजित सिंगची भूमिका निभावली होती आता गदर 2 मध्येदेखील त्याच चरणजित सिंगच्या भूमिकेत तो सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासमवेत आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन दुप्पट होणार असून गदर मधील त्याच वक्तीरेखा पाहताना चाहत्यांना आनंद अनावर होणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे.

Utkarsh Sharma

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गदर 2 चा ट्रेलर रिलिज झाला आहे. या ट्रेलरने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि काही गाण्यांच्या रिलिजनंतर प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चाहते गदर 2 थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट थिएटर मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार असून प्रेक्षकांचे मन जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच आता उत्कर्ष शर्मा आपल्या भूमिकेला न्याय देणार का पाहणेदेखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT