Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office collection Day 1: सध्या हिंदी मनोरंजन विश्वात रॉकी और राणी की प्रेमकहाणीची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवासांपासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक करण जोहरला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.
प्रेक्षक आणि समिक्षकांचाही या चित्रपाटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉलिवूडने जुना काळ पुन्हा मोठ्या पडद्यावर आणला आहे असं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सांगितलं.
या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन काय असेल याची चित्रपट निर्मात्यांना उत्सुकता होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 11.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे. आता हे चित्रपटाच्या कमाईचे अंदाजित आकडे असले तरी अधिकृत आकड्यांमध्ये काही बदल होऊ शकतो. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये आलिया अन् रणवीरच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
आता या चित्रपटाला वीकेंडचा फायदा देखील मिळू शकतो कारण सध्या हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉलिवूड चित्रपट याला टक्कर देण्यासाठी नाही. त्याचा फायदा नक्कीच रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या चित्रपटाला होईल. विकेंडला हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करू शकतो.
रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर 160 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला. ज्यात तुम्हाला करण जोहरच्या जून्या चित्रपटाची पुर्ण झलक दिसते.
हाय एनर्जी, ओव्हर-द-टॉप जोक, कधीकधी खूप मजा, खुप सारा मेलोड्रामा या सगळ्याचा अनुभव या चित्रपटात मिळेल. हा चित्रपट देशभरातील 3200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.
'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटात अनेक हिट कलाकार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन, क्षिती जोग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.