Katrina Kaif Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif Video: कतरिना कैफने उडवली पती विकी कौशलची झोप; पाहा व्हिडिओ

कतरिनाच्या आगामी फोन भूत या चित्रपटात ती भूताची भूमिका साकारत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif Vicky Kaushal) बी-टाऊनमधील एक प्रसिद्ध जोडप आहे. लग्नानंतर दोघेजण पहिल्यांदाच दिवाळी एकत्र साजरी करत आहेत. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, कतरिनाने विकीचा एक क्यूट आणि फनी व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात दोघेजण पहाटे मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओत कतरिना तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाचा डायलॉग बोलून विकीची झोपमोड करताना दिसत आहे.

कतरिना कैफने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत विकी कौशल गाढ झोपेत आहे. मग कतरिना त्याच्याकडे जाते आणि 'मी भूत आहे - मी भूत आहे' असे म्हणू लागते . त्यानंतर विकी घाबरून उठतो आणि कतरिनाकडे पाहतो. यानंतर अभिनेत्री पुन्हा तोच संवाद बोलते. पण, जागे होण्याऐवजी विकी कौशल ब्लँकेट ओढून पुन्हा झोपी जातो.

व्हिडिओ शेअर करताना कतरिनाने त्यावर मजेदार कॅप्शनही दिले आहे. 'बीवी का क्यूट छोटा वेकअप कॉल,' असे कॅप्शन लिहले आहे. कतरिनाच्या शेअर केलेल्या या व्हिडिओला हजारो लाईक्स आले आहेत.

कतरिनाच्या आगामी फोन भूत या चित्रपटात ती भूताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत. फोन भूत हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. हा चित्रपट 04 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT