Ram Setu Thank God Review: कोण सरस! 'राम सेतू' का 'थँक गॉड' दिवाळीचं सर्वोत्कृष्ट गिफ्ट

दोन्ही चित्रपटांची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना होती.
Ram Setu Thank God Review
Ram Setu Thank God ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

अक्षय कुमारचा राम सेतू आणि सिद्धार्थ मल्होत्रा व अजय देवगण यांचा 'थँक गॉड' हे दोन चित्रपट आज प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपटांची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना होती. अखेर हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्या दिवशी कसा प्रतिसाद मिळाला तसेच, कोणता चित्रपट सरस आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणता चित्रपट दिवाळीचं सर्वोत्कृष्ट गिफ्ट ठरला आहे.

'राम सेतू'

अभिषेक शर्मा दिग्दर्शित आणि अक्षय कुमारची मुख्य भुमिका असलेल्या राम सेतू या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. अक्षयचा चित्रपटातील वेगळा लूक आणि त्याच्या दमदार अभिनय याची चाहत्यांकडून स्तुती होत आहे. तसेच, चित्रपटातील व्हीएफएक्स, पटकथा, क्लायमॅक्स या सर्व गोष्टी उत्तम झाल्या आहेत. अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी सोशल मिडियावर दिल्या आहेत. प्रभावित झाले आहेत. चित्रपटाची कथा आणि सर्वांचे अभिनय याची चर्चा सध्या होत आहे.

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने पुरातत्व विशेषज्ञाची भूमिका साकारली आहे. अक्षयने या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केल्याचं दिसतंय. यामध्ये अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Ram Setu Thank God Review
Malika-Arjun: पार्टी सोनम कपूरची तरीही सर्वांच्या नजरा फक्त मलायका-अर्जुन जोडीवर

'थँक गॉड'

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंग यांच्या भूमिका असलेला थँक गॉड हा सिनेमाही आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमातील संवाद, पात्रांची नावं, दृश्य यावरून धार्मिक भावना दुखावत असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, आज या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडी असे स्वरूप असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी वन टाईम वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, दोन्ही सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास दिवाळीनिमित्त प्रदर्शित झालेल्या या दोन्ही सिनेमाला सकाळी थंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी दोन्ही सिनेमांनी किती कमाई केली हे बुधवारी स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com