Ranbir-Alia Wedding photo Twitter
मनोरंजन

रॉकस्टार, हम ना रहें जो, मजा तो नहीं है... म्हणत प्रसिद्ध कंडोम ब्रँडने रणबीर-आलियाला दिल्या शुभेच्छा

अरे रॉकस्टार, आम्हाला ये जवानी है दिवानी माहित आहे, परंतु जेव्हा ती राझी असेल तेव्हा आम्हाला लक्षात ठेव

दैनिक गोमन्तक

अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अखेर 14 एप्रिल रोजी आपल्या राहत्या घरीच लग्न केले. बॉलिवुडच्या या नवविवाहित कपलवर अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये रणबीर- आलियाचे (Ranbir Alia Wedding) फॅन, सिनेजगातील सेलिब्रिटिंसह अनेक उद्योजकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (From rockstar to Hum naa rahein jo Fun toh nahin hai this is how condom brands congratulated Alia Ranbir)

आता झाले असे की, चाहत्यांव्यतिरिक्त, प्रख्यात कंडोम ब्रँडने देखील नवविवाहित जोडप्याला हटके आणि अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यातील आनंदाच्या क्षणांसाठी, सुरक्षेसाठी या कंडोम कंपन्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. लोकप्रिय कंडोम ब्रँड ड्युरेक्सने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये "प्रिय रणबीर आणि आलिया, मेहफिल में तेरे, हम ना रहें जो, मजा तो नहीं है." असे म्हणत पोस्ट शेअर केली आहे.

यामुळे इंटरनेटवर एकच चर्चा उडाली आणि रणबीर आणि आलियासाठी ब्रँडच्या सर्जनशील आणि मजेदार शुभोच्छांचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. या कंडोम कंपन्यांच्या यादीत, ​​स्कोअर आणि मॅनफोर्स सारख्या प्रसिद्ध कंडोम ब्रँडने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. स्कोअरने पोस्ट केले, "अरे रॉकस्टार, आम्हाला ये जवानी है दिवानी माहित आहे, परंतु जेव्हा ती राझी असेल तेव्हा आम्हाला लक्षात ठेवा." असे कॅप्शन स्कोअर कंपनीने आपल्या पोस्ट ला दिले आहे.

दरम्यान 'ब्रह्मास्त्र'च्या शुटींगदरम्यान रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते. रणबीर कपूरच्या लग्नाचे सोहळ्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नानंतर 14 एप्रिल 16 एप्रिल रोजी या जोडप्याने त्यांच्या मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. पार्टीचे काही इनसाइड फोटोजही समोर आले आहेत, ज्यामध्ये रणबीर खूप खुश दिसत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट ड्रीम वेडिंगनंतर, 16 एप्रिल रोजी एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. शाहरुख खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक बी-टाउन स्टार्स पॉवर कपल आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतरच्या पार्टीत सहभागी झाले होते. कपूर आणि भट्ट कुटुंबाच्या या रॉकिंग पार्टीत सर्वांनी खूप धमाल केली आणि या कपलचा दिवस खास बनवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT