Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

'बर्थडे गर्ल' आलिया भट्टनेच चाहत्यांना दिले गिफ्ट

ब्रह्मास्त्रमध्ये आलिया ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रह्मास्त्र चित्रपटातील आलिया भट्टचा 'फर्स्ट लूक' रिलीज करण्यात आला आहे. ब्रह्मास्त्रमध्ये आलिया ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रह्मास्त्रच्या टीझरमध्ये आलिया भट्ट झळकली आहे. या चित्रपटात (Movie) अभिनेत्रीच्या अनेक वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले – हॅप्पी बर्थडे टू मी. तुमच्यासाठी ईशाला भेटण्याचा यापेक्षा चांगला दिवस आणि चांगला मार्ग असू शकत नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनीही ब्रह्मास्त्रमधील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला असून आलिया भट्टला (Alia Bhatt) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचा टीझर शेअर करताना अयान मुखर्जीने लिहिले - हॅपी बर्थडे लिटल वन. आमची ईशा (चित्रपटातील आलिया भट्टच्या पात्राचे नाव) ब्रह्मास्त्राची शक्ती आहे.

ब्रह्मास्त्रमधील आलियाच्या लूकचे पोस्टर शेअर करून करण जोहरने अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करणने लांबलचक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आलिया भट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने (Karan Johar) केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT