Ranbir Kapoor & Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

कमाईत रणबीर कपूरपेक्षा आलिया अव्वलच; जाणून घ्या दोघांची ब्रँड व्हॅल्यू

बॉलिवूडमधील (Bollywood) क्यूट कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीर-आलियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीर-आलियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. जी सध्या मीडियामध्ये चांगलेच चर्चेले जात आहेत. दोघांच्या एकत्र येण्याने इंडस्ट्रीत आणखी एक ब्रँड उदयास आला असून रणबीर आलियाचा हा ब्रँड विराट-अनुष्का, रणवीर-दीपिका यांसारख्या इतर जोडप्यांपेक्षा अधिक मौल्यवान ठरु शकतो, असे मानले जात आहे. वास्तविक, रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) हे सध्या जाहिरात क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध नावे आहेत. चाहत्यांनी या दोघांवर अफाट प्रेम केले. विशेष म्हणजे यातूनही आलियाची ब्रॅंड व्हॅल्यू ही रणबीरपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. चला तर मग रणबीर आणि आलियाची ब्रँड व्हॅल्यू किती आहे, ते जाणून घेऊया... (Find out the brand value of Ranbir Kapoor and Alia Bhatt)

आलिया रणबीरपेक्षा दुप्पट मौल्यवान

अनेक यशस्वी चित्रपट केलेल्या आलिया आणि रणबीरची ब्रँड व्हॅल्यू लाखो डॉलर्समध्ये आहे. यातील आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू रणबीर कपूरच्या ब्रँड व्हॅल्यूपेक्षा दुप्पट आहे. मनी कंट्रोलच्या एका बातमीने डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2021 चा हवाला देऊन म्हटले आहे की, 'आलिया भट्टचे ब्रँड मूल्य $68 दशलक्ष आहे. त्याच वेळी, रणबीर कपूरची ब्रँड व्हॅल्यू $ 26 दशलक्ष आहे.' 2021 मध्ये ब्लेंडर्स प्राइड, JSW पेंट्स आणि कोपिको सारख्या ब्रँड्ससह आलिया ही महिला सेलिब्रिटी होती. आलिया आता हॉलिवूडमध्येही (Hollywood) पाऊल ठेवणार आहे. आलिया भट्टने 2012 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्याचवेळी रणबीर कपूरचा पहिला चित्रपट 2007 मध्ये आला होता. रणबीर कपूरच्या सर्वात लक्षात राहिलेल्या चित्रपटांमध्ये वेक अप सिड, अजब प्रेम की गज़ब कहानी, पॉलिटिक्स, रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानी यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आलियाने 'हायवे', 'राझी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटांमधून आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडली.

आलियाची ब्रँड व्हॅल्यू वाढतेय

आलिया भट्टच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत, आलियाने अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या क्रॉल 2021 यादीत ब्रँड मूल्याच्या बाबतीत आलिया चौथ्या क्रमांकावर होती. भारतीय सेलिब्रिटींच्या टॉप 10 यादीत आलिया सर्वात तरुण आहे. या यादीत पहिला क्रमांक विराट कोहलीचा आहे, त्याची ब्रँड व्हॅल्यू 180 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 160 दशलक्ष डॉलर्स आहे. अक्षय कुमारची संपत्ती जवळपास $140 दशलक्ष आहे. आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर असून धोनी पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू $60 दशलक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT