Alia-Ranbir Wedding: आलिया आणि रणबीर यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरु

बॉलीवुडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरुवात होत आहे.
Alia-Ranbir Wedding
Alia-Ranbir WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवुडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरुवात होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 15 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून म्हणजेच, 13 एप्रिलपासून सुरू होत आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधीच्या विधींची सुरुवात मेहंदी समारंभाने होणार आहे. रणबीरच्या 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये जवळचे कौटुंबिक सदस्यामध्ये हा समारंभ होणार आहे. रणबीरच्या (Ranbir Kapoor) घराची सुंदर आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याच बिल्डिंगमध्ये आलियाचाही फ्लॅट आहे आणि तिचे घरही फुलांनी आणि लाइटींगने सजवण्यात आले आहे.

* आलिया-रणबीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरू

रणबीर आणि आलिया मुंबईतील 'वास्तू' बिल्डिंगमध्ये लग्न करणार आहेत, जिथे आलिया आणि रणबीर दोघांचे स्वतंत्र अपार्टमेंट आहेत. 12 एप्रिल पासूनच या बिल्डिंगची सजावट करण्यास सुरुवात झाली होती. या आकर्षक रोषनाईने सजावट करण्यात आली आहे.

Alia-Ranbir Wedding
सेम टू सेम! आलिया- रणबीरने कॉपी केली कतरिना-विकीच्या वेडिंग आयडिया

12 एप्रिल रोजी, रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिच्या मुली आणि पतीसह मुंबई विमानतळावर दिसली, रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल विचारले असता तिने सांगितले की "लवकरच लग्नात भेटू". तर संध्याकाळी रणबीरचा मित्र आणि दिग्दर्शक आयन मुखर्जी देखील त्याच्या वस्तु अपार्टमेंटमध्ये येताना दिसला. आलिया रणवीर सिंगसोबत कर्जतमध्ये करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे (Movie) शूटिंग करत होती. ती मुंबईत आल्याची माहिती मिळत आहे. सर्व चाहत्यांना आता आलिया आणि रणबीरच्या समारंभाच्या फोटोंची उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com