Manoj Bajpayee Indian actor  Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Bajpayee: प्रतिक्षा संपली! लवकरच 'फॅमिली मॅन'चा ३ रा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला

Manoj Bajpayee: आता या शो चा तिसऱा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Manoj Bajpayee: बॉलीवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेली फॅमिली मॅन ही वेब सीरीज चांगलीच गाजली होती. या सीरीजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता या शो चा तिसऱा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मार्च महिन्यात फॅमिली मॅन ३ चे शूटिंग सुरू होईल. हा सीझन मागील सीझनपेक्षा मोठा आणि चांगला असेल आणि त्यांचे पात्र अधिक आव्हानात्मक असणार असल्याचे मनोज बाजपेयींनी म्हटले आहे. त्यांची टीम लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

मनोज बाजपेयी म्हणाले, 'आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग सुरू करू. सध्या आम्ही तयारीच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे एकदा आम्ही ते सुरू केले आणि पूर्ण केले की, ते रिलीजसाठी तयार होण्यापूर्वी आणखी 8 महिने पोस्ट-प्रॉडक्शन लागतील. म्हणजेच हा शो या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकतो.

द फॅमिली मॅन हा स्पाय थ्रिलर वेब शो आहे. मनोजने श्रीकांत तिवारीची भूमिका केली आहे, जो मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि एक गुप्तचर अधिकारी आहे. या शोमध्ये प्रियामणी, शरद केळकर, नीरज माधव, शारिब हाश्मी, दलीप ताहिल, सनी हिंदुजा आणि श्रेया धन्वंतरी हे कलाकार आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT