The Family Man 2. Dainik Gomantak
मनोरंजन

Family Man 3 : मनोज वाजपेयींनी सांगितली फॅमिली मॅन 3 च्या रिलीजची तारीख...चाहत्यांच्या आनंदाला येणार उधाण

चाहत्यांना वेड लावणाऱ्या मनोज वाजपेयींची वेब सिरीज फॅमिली मॅन या दिवशी होणार रिलीज.

Rahul sadolikar

मनोज बाजपेयी स्टारर द फॅमिली मॅन ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सीरिजपैकी एक आहे. क्राईम ड्रामाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. द फॅमिली मॅनचे दोन्ही सीझन लोकांना खूपच आवडले. 

लोक आता त्याच्या तिसऱ्या सिजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच मनोज बाजपेयीने 'द फॅमिली मॅन 3' बद्दल एक मोठी बातमी दिली आहे.  

नुकतेच, मनोज बाजपेयी यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला जेथे त्यांनी द फॅमिली मॅन 3 बद्दल सांगितले. मनोजला सीझन 3 च्या शक्यतेबद्दल विचारले गेले आणि त्याने सा्ंगितले . 

या सिरीजमधल्या स्वतःच्या स्टाईलमध्ये , मनोज म्हणाला, “आज सकाळी एक पक्षी उडून माझ्या खिडकीवर बसला आणि आम्ही म्हणालो की कदाचित आपण या वर्षाच्या शेवटी शूट करू शकू आणि जर पैसे वाचवून सर्व काही ठीक झाले तर. आम्ही करू."

फॅमिली मॅन सीझन 2 चा प्रीमियर 2021 मध्ये झाला आणि तेव्हापासून चाहते सीझन 3 बद्दल खूप उत्सुक आहेत. या वेब सीरिजमध्ये मनोज बाजपेयी रॉ एजंट, एक चांगला पिता आणि नवरा अशा दुहेरी जीवनात संघर्ष करत आहे. 

पहिल्या सिजनमध्ये तो दहशतवाद्यांशी लढला, तर दुसऱ्या सिजनमध्ये समंथा रुथ प्रभू त्याचा मुकाबला करताना दिसली. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरिजच्या दुसऱ्या सिजनच्या शेवटी, असे संकेत देण्यात आले होते की यावेळी श्रीकांत कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे.

अलीकडेच, राज आणि डीकेची वेब सीरिज फर्जी आली, ज्यामध्ये द फॅमिली मॅनचे मनोज बाजपेयी आणि चेल्लम सर देखील कॅमिओमध्ये दिसले. शाहिद कपूरने या मालिकेद्वारे ओटीटीच्या जगात पाऊल ठेवले. 

तर मनोज बाजपेयी नुकताच गुलमोहर या चित्रपटात दिसला होता. चाहत्यांना प्रचंड आतुरता असलेला तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

SCROLL FOR NEXT