गेल्या काही दिवसांपासुन बी टाऊनमधल्या गटबाजीवरून मोठी वादावादी सुरू होती, बॉलिवूडमध्ये काही लोक गटबाजी करुन इतरांना त्रास देतात अशी चर्चा करण्यात आली होती. प्रियांका चोप्राने थेट करण जोहरचे नाव घेऊन त्याच्यामुळेच मी भारत सोडला असं सांगितलं होतं. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मुळे मात्र प्रियांका चांगलीच ट्रोल होत आहे.
यानंतर कंगना रणौतने चित्रपट निर्माता करण जोहरचे नाव घेतले आणि सांगितले की त्यांनी प्रियांकावर बंदी घातली होती, त्यामुळे अभिनेत्री हॉलिवूडकडे वळली. हे वक्तव्य समोर आल्यानंतर पुन्हा एकदा करण जोहर यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे.
अनेक सोशल मीडिया यूजर्सनी करण जोहरला ट्रोल केले की प्रियांकाला करणमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्री सोडावी लागली. पण नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दोघेही ज्या पद्धतीने एकमेकांना भेटले ते पाहता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी उद्घाटन सोहळ्याच्या पार्टीला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली. अनेक स्टार्सची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा आणि करण जोहर देखील उपस्थित होते आणि दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसले.
प्रियांका निक जोनाससोबत स्टार्स स्टड इव्हेंटसाठी पोहोचली होती. तर करण जोहर एकटाच पार्टीला उपस्थित होता. मात्र, भेटताच प्रियांका आणि करणने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ चर्चेत राहिला आहे.
मात्र, अनेक यूजर्सनी या दोघांना ट्रोल केले आहे. एकाने कमेंट केली, 'मला सांगा, आधी तिला बॉलीवूडमधून बाहेर काढण्यात आले आणि आता तिला मिठीही मारली जात आहे. जग किती खोटे आणि दिखाऊ आहे.
कंगना आणि प्रियांकाकडे पाहता, असे वाटत नव्हते की भूतकाळात त्यांच्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक नव्हते. अशा परिस्थितीत करण जोहरने प्रियांकाला बॉलिवूडमधुन बाहेर काढल्या कंगनाचा दावा कितपत खरा आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे.
तिने ट्विट केले होते की, 'प्रियांका बॉलीवूडबद्दल हेच सांगू इच्छिते, लोक तिच्या विरोधात उभे राहिले, तिची छेड काढली आणि तिला फिल्म इंडस्ट्रीतून बाहेरचा रस्ता दाखवला. स्वतःच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकाला भारत सोडावा लागला. करण जोहरने त्याच्यावर बंदी घातली हे सर्वांना माहीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.