Yo Yo Honey Singh News Dainik Gomantak
मनोरंजन

Honey Singh: हनी सिंग पुन्हा एकदा वादात, मुंबईत अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप

एका कार्यक्रमाच्या आयोजकाने हनी सिंगवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Honey Singh: रॅपर हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हनी सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका कार्यक्रमाच्या आयोजकाने हनी सिंगवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक रमण असे तक्रारदाराचे नाव असून, त्याने पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे.

हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी कार्यक्रम आयोजकाचे अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. हनी सिंग अलीकडेच गर्लफ्रेंड टीना थडानीसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळेही चर्चेत होता.

'विवेक रमन एका इव्हेंट कंपनीचा मालक आहेत. त्यांनी हनी सिंगवर अपहरण, डांबून ठेवणे आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. विवेक रमण यांनी तक्रारीत म्हटले आहे की, हनी सिंग आणि काही लोकांनी त्याचे अपहरण केले आणि मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्याला कैद केले. त्यानंतर त्यांना मारहाण केली. असे मुंबई पोलिसांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

बुधवार, 19 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार रमण यांनी 15 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रॅपर्स देखील कार्यक्रमाचा एक भाग होते. मात्र पैशांच्या व्यवहारात तफावत आढळल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला. या वादानंतर हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केला.

तक्रारदाराची मागणी

पोलिसांनी हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी पीडितेची मागणी आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे पोलिसांनी म्हटले आहे. हनी सिंग सध्या सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील 'लेट्स डान्स छोटू मोटू'साठी देखील चर्चेत आहे.

हनी सिंगचे ब्रेकअप आणि पहिले लग्न

अलीकडे हनी सिंग ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. हनी सिंग आणि गर्लफ्रेंड टीना थडानी यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. त्यांचे नाते फक्त एक वर्ष टिकले. हनी सिंगचा घटस्फोट झाला आहे. गेल्या वर्षीच त्यांचे माजी पत्नी शालिनी तलवार यांच्याशी समझोता झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT