Aaradhya Bachchan Fake News Youtube Controversy: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन विषयी यूट्यूबवर चूकीची माहीती देण्यात आली आहे.
आराध्याच्या आरोग्याविषयी खोट्या बातम्या समोर आल्यानंतर आराध्याच्यावतीने बच्चन कुटूंबाने दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली होती.
आता याचिकेवर निकाल देताना दिल्ली हायकोर्टाने यूट्यूबला फटकारले आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी कठोर शब्दात कानउघडणी केली आहे.
तुमच्याकडे अशी कोणती नीती आहे का? ज्याने खोट्या बातम्या पसरवू नयेत हे सुनिश्चित केले जाऊ शकते.
अपलोड केलेल्या प्रत्येक व्हीडीओपासून तुम्ही लाभ घेत नाहीत काय? अशा प्रकरणात यूट्यूबची काही जबाबदारी नाही का? तुम्ही फक्त हे म्हणू शकत नाही की आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देतो. त्या प्लॅटफॉर्मवर काय दाखवले जाते हे पाहणे तुमची जबाबदारी नाही का?
याबरोबरच आराध्याबाबतच्या खोट्या बातम्या युट्यूबवरुन काढण्यास सांगितले आहे. यासारख्या खोट्या बातम्या न पसरवण्याची चेतावणीदेखील दिली आहे. या आदेशाचे पालन एका आठवड्यात करुन रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
याबरोबरच, कोर्टाने अशा खोट्या बातम्या देण्याऱ्या 9 वेबसाइटस आणि 4 अपलोडर्स विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गुगल आणि यूट्यूबने आयटी मध्ये दुरुस्ती केल्यानुसार बदल केले आहेत का असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे. प्रत्येक बालकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे म्हणत युट्यूबला दिल्ली हायकोर्टाने फटकारले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.