Actress Elnaaz Norouzi Dainik Gomantak
मनोरंजन

"इराणला गेले तर माझी हत्या होईल" 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्रीनेचा थरारक खुलासा; जिवाच्या भीतीनं 10 वर्षांपासून मायभूमी पाहिली नाही

Actress Elnaaz Norouzi On Ayatollah Ali Khamenei Khamenei: सेक्रेड गेम्स' फेम इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी सध्या तिच्या एका धाडसी विधानामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे.

Manish Jadhav

Sacred Games Actress Elnaaz Norouzi: 'सेक्रेड गेम्स' फेम इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी सध्या तिच्या एका धाडसी विधानामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचे समर्थन केल्यानंतर एलनाजने आता एका मुलाखतीत आपल्या मायदेशातील भयानक परिस्थितीवर भाष्य केले. इराणमध्ये सध्या सत्तेत असलेल्या 'इस्लामिक रिपब्लिक'च्या राजवटीला आपला विरोध असून जोपर्यंत हे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत आपण इराणमध्ये पाऊलही ठेवू शकत नाही, कारण तिथे गेल्यावर आपली हत्या केली जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत एलनाजने इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. तिने स्पष्ट केले की, "जेव्हा आपण इराणबद्दल बोलतो, तेव्हा तिथे राहणारे लोक आणि तिथली सत्ताधारी 'इस्लामिक रिपब्लिक' यांच्यात फरक करणे गरजेचे आहे. इराणमधील बहुसंख्य जनता सुशिक्षित आणि प्रगत विचारांची आहे, त्यांचे विचार या कट्टरपंथी राजवटीशी जुळत नाहीत. इतिहासात डोकावले तर समजेल की, सायरस द ग्रेट यांच्या काळात इराणनेच ज्यूंना बॅबिलोनमधून मुक्त केले होते आणि मानवी हक्कांची पहिली सनद लिहिली होती. शहांच्या काळात आमचे अमेरिकेसोबतही उत्तम संबंध होते. केवळ ही सध्याची राजवटच इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या वल्गना करत आहे."

एलनाजचा जन्म 90च्या दशकात इराणमध्ये झाला होता, मात्र वयाच्या 8व्या वर्षी ती कुटुंबासह जर्मनीला स्थायिक झाली. त्यानंतर तिने युरोपमध्ये मॉडेलिंग केले आणि विसाव्या वर्षी ती भारतात आली. गेल्या 10 वर्षांपासून ती इराणला (Iran) गेलेली नाही. 2022 मध्ये महसा अमिनी या तरुणीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर इराणमध्ये जे हिंसक आंदोलन झाले, तेव्हापासून एलनाजने या राजवटीविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. हिजाबवरुन सुरु झालेल्या त्या आंदोलनावेळी एलनाजने खामेनेईंच्या विरोधात आवाज उठवला होता, तेव्हापासून तिच्या कुटुंबाला तिच्या सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे.

एलनाजने या राजवटीला थेट 'हुकूमशाही' संबोधले असून तिचे म्हणणे आहे की, या युद्धात जर निष्पाप लोक मारले जात असतील, तर त्याला केवळ अयातुल्ला जबाबदार आहेत. लोकांनी वारंवार रस्त्यावर उतरुन "आम्हाला तुम्ही नको आहात" असे सांगूनही ही सत्ता सोडली जात नाही, ही शोकांतिका आहे.

एलनाजने 2017 मध्ये पाकिस्तानी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आणि 'सेक्रेड गेम्स'मुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने 'अभय', 'मेड इन हेवन' आणि बॉलीवूडमधील 'जुग जुग जिओ' सारख्या चित्रपटांत काम केले आहे. नुकताच तिने जेरार्ड बटलरसोबत 'कंदहार' मधून हॉलिवूडमध्येही पदार्पण केले असून सध्या ती अक्षय कुमारसोबत एका शोमध्ये सह-निवेदक म्हणून दिसत आहे. मात्र, करिअरच्या यशाच्या शिखरावर असूनही आपल्या मायदेशात परतता येत नसल्याची सल तिच्या बोलण्यात स्पष्टपणे जाणवत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

Missile Attack: लाईव्ह व्हिडिओत कोसळलं 'मिसाईल'! दुबईतलं धडकी भरवणारं फुटेज व्हायरल; महिलेचा जागीच मृत्यू Watch Video

"गोव्यात येऊन समाधानी आहात का"? UAE मधून परतणाऱ्या गोमंतकीयाने Social Media वर विचारला प्रश्न; युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

होळीची तयारी करतानाच काळाचा घाला! पेटता खांब कोसळून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मेणकुरे गावात पसरली शोककळा

Adult Content Ban: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' कडून भारतात अडल्ट कंटेंटवर बंदी; केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर इलॉन मस्क यांचे पाऊल

SCROLL FOR NEXT