Dolly Sohi Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Dolly Sohi Passes Away: बहिणीपाठोपाठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; सर्व्हिकल कॅन्सरबरोबर अयशस्वी झुंज

Dolly Sohi Passes Away: आज दुपारी ड़ॉली सोहीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

TV Actress Dolly Sohi Passes Away

टीव्ही अभिनेत्री ड़ॉली सोहीचे सर्व्हिकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्चला सकाळी डॉलीचे निधन झाले आहे. आम्हाला याचा धक्का बसलाअसल्याचे परिवाराने म्हटले आहे. दु:खद बाब म्हणजे एक दिवस आधी डॉलीची बहिण अमनदीप सोहीचे कावीळ या आजारामुळे निधन झाले आहे. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला आहे. आज दुपारी ड़ॉली सोहीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून डॉली सोही सर्व्हिकल कॅन्सरचा सामना करत होती. अनेक वेळा ती सोशल मिडियावर फोटोदेखील फोटोदेखील पोस्ट करताना दिसत होती. आपण बरे होत असल्याचे तीने बऱ्याच वेळा सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले होते.डॉली सोही यांना नुकतेच श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले.

कलश, झनक, मेरी आशिकी तुम से ही, भाभी, कुमकुम भाग्य अशा अनेक मालिकांमधून अभिनेत्रीने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला होता.

दोघी बहिणींचे एकाच वेळी निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, डॉली सोही यांच्या परिवारात त्यांची मुलगी एमेलिया ही आहे. अभिनेत्री आपल्या पतीपासून विभक्त झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT