ranveer singh Dainik Gomantak
मनोरंजन

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

Dhurandhar 2 Box Office Collection: प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरचा बहुप्रतिक्षित थ्रिलर चित्रपट 'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

Manish Jadhav

Dhurandhar 2 Box Office Collection: प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरचा बहुप्रतिक्षित थ्रिलर चित्रपट 'धुरंधर 2' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये असा काही पराक्रम केला की, बॉलिवूडसह साऊथच्या मोठ्या चित्रपटांना मागे सोडले. विशेष म्हणजे, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत या चित्रपटाने शाहरुख खानचा 'जवान' आणि एसएस राजामौली यांच्या 'RRR' ला धूळ चारली. चाहत्यांचा प्रचंड ओघ पाहून निर्मात्यांनी आता हा चित्रपट 19 मार्चऐवजी 18 मार्चच्या संध्याकाळीच प्रदर्शित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की, 'धुरंधर 2' ची क्रेझ गगनाला भिडली आहे. 18 मार्चच्या संध्याकाळच्या शोजसाठी आतापर्यंत 37.11 कोटी रुपयांची कमाई झाली असून तिकीट खिडकीवर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या दिवसासाठी (19 मार्च) तब्बल 6.1 लाख तिकिटांची विक्री झाली असून, त्यातून 22.70 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाने आपला डंका वाजवला आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये वीकेंडसाठी 60 कोटींहून अधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. यामुळे अवघ्या दोन दिवसांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने जगभरातून 119.81 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून वेळ असल्याने हा आकडा सहजपणे 150 कोटींच्या पार जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

उत्तर अमेरिकेत तर 'धुरंधर 2' ने रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी केली. तिथे अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने 5 मिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला. यापूर्वी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण', राजामौलींचा 'RRR' आणि प्रभासचा 'बाहुबली 2' या चित्रपटांनी तिथे साधारण 4 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. या सर्व दिग्गज चित्रपटांना मागे सारत 'धुरंधर 2' ने परदेशात भारतीय सिनेमाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार पडद्यावर जादू करण्यासाठी परतत आहेत. पहिल्या भागात 'रहमान डकैत' या विलनच्या भूमिकेतून प्रेक्षकांना घाबरवणारा अक्षय खन्ना या भागात कॅमिओ भूमिकेत दिसण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. आदित्य धरचा हा स्पाय थ्रिलर केवळ अ‍ॅक्शनच नाही, तर बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT