Dhanush  Dainik Gomantak
मनोरंजन

Vaathi Box Office Collection: 'धनुष'च्या वाथीने कमावले 100 कोटी...एका शिक्षकाची गोष्ट सांगणारा चित्रपट

साऊथ सुपरस्टार धनुषच्या वाथीने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Rahul sadolikar

Vaathi Box Office Collection : साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष च्या 'वाथी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला कमावला आहे. प्रादेशिक चित्रपटांसाठी ही कमाई खूपच मोठी असते. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

अभिनेता धनुषचा तामिळ-तेलुगू द्विभाषिक चित्रपट वाथी, 1990 च्या दशकात शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एका माणसाच्या लढ्याची गोष्ट सांगतो. वाथीने आतापर्यंत जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात धनुष एका प्राध्यापकाच्या भूमिकेत आहे जो त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतो

वेंकी अटलुरी दिग्दर्शित हा चित्रपट एकाच वेळी तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला. तामिळमध्ये वाथी असं या चित्रपटाचं नाव आहे तर तेलुगू नाव SIR आहे. आठवड्याच्या शेवटी, निर्मात्यांनी अधिकृत पोस्टर ट्विट्टरवर शेअर केले आहे.

चित्रपटाने ₹ 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. धनुषनेसुद्धा पोस्टर शेअर करत ट्विट केले आणि तीन हात जोडलेले इमोजी शेअर केले.

गेल्या वर्षीच्या तिरुचित्रंबलम नंतर धनुषचा हा  100 कोटी कमावणारा सलग दुसरा चित्रपट आहे  वेत्रीमारन दिग्दर्शित त्याच्या आणखी एक तमिळ चित्रपट असुरनने देखील त्याच्या थिएटर रन दरम्यान ₹ 100 कोटींची कमाई केली होती.

GV प्रकाश कुमार यांचे संगीत असलेल्या वाथीमध्ये संयुक्ता आणि समुथिरकानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना, वेंकी अटलुरी यांनी प्रकाशनपूर्व पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, तो विद्यार्थी असताना त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांनी त्याला वाथी बनवण्याची प्रेरणा दिली. 

दिग्दर्शक वेंकी अटलुरी म्हणतात “मी 1998 च्या सुमारास 12वी पूर्ण केली. तेव्हा खाजगी शाळांची भरभराट होत होती आणि हळूहळू सरकारी शाळांचा ताबा घेतला होता. तेव्हा हा एक मोठा मुद्दा बनला होता आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारलाही सहभागी करून घेतले. 

यातील काही घटनांनी मला वाथी बनवण्याची प्रेरणा दिली.” हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण आणि त्याविरोधात एका माणसाने कसा संघर्ष केला यावर प्रकाश टाकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: कळंगुट हल्ला प्रकरण: आरोपी पवारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT