Deepika Padukone and Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

दीपिका आणि शाहरुख रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार

जवानामध्ये दीपिकाचीही एन्ट्री झाली आहे.

दैनिक गोमन्तक

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांची जोडी यापूर्वी एकत्र दिसली आहे. आता दोघे पठाणमध्येही एकत्र काम करत आहेत. पण आता बातमी आहे की पठाण व्यतिरिक्त ते आणखी एका चित्रपटात एकत्र दिसणार असून या चित्रपटाचे नाव आहे जवान.

जवानात दीपिकाची भूमिका कशी असेल?
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जवानामध्ये दीपिकाचीही एन्ट्री झाली आहे. अलीकडेच शाहरुख खान हैदराबादमध्ये होता आणि दीपिकाही प्रभाससोबत प्रोजेक्टचे शूटिंग करत होती. इथेच शाहरुख खान आणि दीपिकाची भेट झाली. शाहरुखने दीपिकाला ही भूमिका ऑफर केली आहे. दीपिकाने यासाठी होकारही दिल्याचे बोलले जात आहे. नुकताच शाहरुखच्या जवान चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

दीपिकाने शाहरुखसोबत पदार्पण केले
तसे, 2007 मध्ये दीपिकाने शाहरुख खानसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ओम शांती ओम हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि या चित्रपटानंतर दीपिकाने मागे वळून पाहिले नाही. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आणि या 15 वर्षांत ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली आहे. आगामी काळात दीपिकाचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रोजेक्ट के मध्ये प्रभाससोबत, फायटरमध्ये हृतिक आणि पठाणमध्ये शाहरुख खानसोबत ती असेल. पठाण व्यतिरिक्त शाहरुख डंकी आणि जवान या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT