Deepika - Ranveer Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika And Ranveer: दीपिका अन् रणवीरच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Deepika And Ranveer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आई होणार आहे. तिने एक फोटो शेअर करत गुड न्युज दिली आहे.

Puja Bonkile

Deepika Padukone Ranveer Singh announce pregnancy share photo on social media

बॉलीवूडमधील पॉवर कपलपैकी एक दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दीपिका पदूकोण आणि रणवीरने सोशल मिडियावर पोस्ट करत गुड न्युज दिली आहे. बॉलिवूड कलाकारांसह अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

दीपिका-रणवीरची खास पोस्ट

दीपिका-रणवीरने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका-रणवीरच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे असे सांगितले आहे. दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटमध्ये लहान मुलांचे हातमोजे,टोपी, ड्रेस,शुज आणि खेलणी दिसत आहे. अलीकडेच पार पडलेल्या बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये, चाहते दीपिकाचा बेबी बंप लुक दिसत आहे अशी चर्चा होती. तेव्हापासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. दीपिकाने पोस्ट शेअर करत गुड न्युज शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि बॉलिवुड कलाकारंकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजेशाही थाटात पार पडले होते लग्नसोहळा

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नोव्हेंबर 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. रणवीर आणि दीपिकाने इटलीतील लेक कोमो येथे दोन विधींनी लग्न केले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी गुड न्युज दिली आहे. दीपिका आणि रणवीर हे बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ही जोडी 'दीपवीर' या नावाने ओळखली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT