OTT

 

Dainik Gomantak

मनोरंजन

दिवाळखोऱ्या विजय मल्ल्यावर लवकरच येणार वेब सिरीज

विजय मल्ल्या यांच्यावर बनवल्या जाणाऱ्या वेब सीरिजला एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मचा पाठिंबा मिळाला आहे ज्याने ती स्ट्रीम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील सर्वात गाजलेले आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व विजय मल्ल्या, ज्यांच्या साम्राज्याची कहाणी कोणापासूनही लपलेली नाही.

गेल्या वर्षी निर्माता सुनील बोरा (Sunil Bohra) यांच्या प्रोडक्शन हाऊस ऑलमाईटीने विजय मल्ल्यावरती बनलेल्या पुस्तकाचे राइट्स विकत घेतले होते आणि लवकरच त्यावर एक वेब सिरीज बनवणार असल्याची घोषणा तेव्हा करण्यात आली होती.

आता अलीकडेच याबाबतचे ताजे अपडेट समोर आले आहेत, म्हणजेच विजय मल्ल्या यांच्यावर बनवल्या जाणाऱ्या वेब सीरिजला एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मचा पाठिंबा मिळाला आहे ज्याने ती स्ट्रीम करण्याचा निर्णय घेतला आहे.

MX Player आता विजय मल्ल्याची (Vijay Mallya) वेब सिरीज (Web series) त्याच्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल. इतकंच नाही तर MX Player देखील निर्माता म्हणून या प्रकल्पात सामील झाला आहे. म्हणजेच, निर्माता सुनील बोरा यांची प्रॉडक्शन कंपनी ऑलमाईटी यांच्या सहकार्याने MX Player या वेब सिरीजची निर्मितीही करणार आहे.

Mx Player वरील प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आश्रमाचे दोन्ही अध्याय खूप यशस्वी झाले आहेत. एवढेच नाही तर या वेब सीरिजसाठी बॉलिवूडमधील एका विशिष्ट अभिनेत्याला कास्ट करण्याची चर्चा आहे. याची प्रक्रियाही लवकरच संपणार आहे. तसेच 2022 पर्यंत या वेब सीरिजचे शूटिंगही सुरु होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT