Lairai Jatra: 'प्रत्येकाने संयम, नियम आणि शिस्त पाळावी'! लईराई जत्रोत्सवासाठी बैठक; प्रशासनासह देवस्थानकडून आवाहन

Lairai Jatra 2026: शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी धोंड भक्तगणांसह तमाम भाविकांनी आपली जबाबदारी ओळखावी.
Lairai Jatra festival court notice
Lairai Jatra festival court noticeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी धोंड भक्तगणांसह तमाम भाविकांनी आपली जबाबदारी ओळखावी. प्रत्येकाने संयम, नियम आणि शिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासन आणि देवस्थान समितीकडून (रविवारी) झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे.

पुढील महिन्याच्या २१ तारखेला लईराई देवीची जत्रा साजरी होणार आहे. जत्रेच्या पार्श्वभूमीवर श्री लईराई देवस्थान समितीतर्फे (रविवारी) शिरगाव येथे धोंड भक्तगणांसाठी खास बैठक बोलाविली होती. डिचोलीचे मामलेदार शैलेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीनानाथ गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी पोलिस निरीक्षक विजय राणे, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि महाजन उपस्थित होते.

या बैठकीस वेगवेगळ्या भागातील मिळून दोन हजारापेक्षा अधिक धोंड भक्तगण उपस्थित होते. गेल्यावर्षी जत्रेवेळी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. त्यासाठी प्रत्येक भाविकांनी काळजी घेऊन सहकार्य करावे. मंदिर आणि होमकुंडस्थळी गर्दी टाळावी. प्रशासन आणि देवस्थान समितीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केले.

जत्रेच्यादिवशी रस्त्याच्या बाजूने एकही दुकान थाटण्यास परवानगी देणार नाही. प्रशासनाकडून दिलेल्या सूचना आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. धोंड भक्तगणांसाठी पाणी आदी व्यवस्था करण्यात येईल. देवीच्या दर्शनासाठी धोंड भक्तगण आणि अन्य भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येईल.

Lairai Jatra festival court notice
Lairai Jatra: लईराई देवस्थान जत्रोत्सवाची तयारी! देवस्थान समितीकडून भाविक, धोंडांना सहकार्य करण्याचे आवाहन

एखादी दुर्घटना घडणार नाही. त्यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती दीनानाथ गावकर यांनी दिली. मामलेदार शैलेंद्र देसाई आणि पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी सुरक्षेच्यादृष्टीने कोणती आणि कशी उपाययोजना करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था कशी असेल. त्याबाबत माहिती दिली.

Lairai Jatra festival court notice
Lairai Jatra: 'शिरगावातील धोकादायक ठिकाणे निश्चित करा'! लईराई जत्रोत्सवाबाबत कोर्ट गंभीर; गर्दी नियोजनाचे काम सुरू करण्याचे आदेश

चेंगराचेंगरीतील मृत भाविकांना श्रद्धांजली!

महाजनांतर्फे बाबुली गावकर, सूर्यकांत गावकर, बाबुसो गावकर, अजय गावकर आदींनी धोंड भक्तगणांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित काही धोंडभक्तगणांनी काही सूचना केल्या. गेल्या वर्षीच्या दुर्घटनेला धोंड भक्तगण जबाबदार नसल्याचा दावाही त्यांनी केला. बैठकीच्या सरतेशेवटी गेल्यावर्षी चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com